MP Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati demands Chhatrapati Shivaji Maharaj Study Center at Goa University 
कोल्हापूर

'गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राची मागणी'

संदीप खांडेकर

कोल्हापूर : गोवा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र उभारण्याची मागणी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे आज केली.नवीन विद्यार्थी, अभ्यासक आणि इतिहासकारांना त्याचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. गोव्यात जाऊन त्यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेतली.

यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी मागणी अगदी रास्त असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली. रायगड विकास प्राधिकरणाला, गोवा सरकारने पोर्तुगीज कागदपत्रे, पत्रव्यवहार आणि संदर्भग्रंथ याबाबत सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. गोव्याचे पोर्तुगीज आणि मराठा सत्तांमध्ये नेहमी संघर्ष राहिला होता. व्यापारी संबंध देखील होते. त्यामुळे अनेक पत्रव्यवहार झाले होते. त्यातून रायगड संबंधातील काही नोंदी सापडतील का? हा प्रमुख उद्देश आहे. तसे थेट पुरावे सापडले तर, रायगड संवर्धन कार्यात त्याचा उपयोग होईल, असे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री सावंत यांनी पोर्तुगीज, मराठी किंवा इंग्रजी जाणणारे लोक आहेत. त्यांच्या माध्यमातून प्राधिकरणाला सर्व ती कागदपत्रे उपलब्ध करून देऊ. गोव्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या अधिपत्याखालील किल्ल्यांचे संवर्धन करत आहोत. अनेक ठिकाणी स्मारके उभी करण्यास सुरुवात केली आहे. किल्ले संवर्धन आणि जतन यामध्ये तुमचे योगदान मोठे आहे. तुमच्या अनुभवाचा लाभ गोवा सरकारला सुद्धा झाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांना किल्ले संवर्धनाचे काम एकत्र येऊन काम करण्यासह सहकार्य करण्याची भूमिका मांडली.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Raina and Dhawan : मोठी बातमी! सुरेश रैना, शिखर धवनला ‘ED’चा दणका ; तब्बल ११.१४ कोटींची संपत्ती जप्त!

Stock Market Closing : आज शेअर बाजार लाल रंगात बंद! निफ्टी अन् सेन्सेक्स कितीवर? पाहा एका क्लिकमध्ये.

Sanjay Raut: '...हा आमच्या पिढीचा मंत्र होता'! हाताला सलाईन, पण बोटांमध्ये पेन धरलं; रुग्णालयातून संजय राऊतांकडून फोटो शेअर

Latest Marathi Live Update News : माझ्यावर कारवाई का केली, हेच मला माहिती नाही : सूर्यकांत येवले

Margashirsha Month 2025: मार्गशीर्ष महिन्यात चुकूनही करू नका हे काम! वाचा काय करावं आणि काय टाळावं

SCROLL FOR NEXT