Lakshtirth Colony Kolhapur esakal
कोल्हापूर

दोन अनधिकृत प्रार्थनास्थळांवरून कोल्हापुरात तणाव; लक्षतीर्थ वसाहतीला पोलिस छावणीचं स्वरूप, काय आहे प्रकरण?

लक्षतीर्थ वसाहतीत (Lakshtirth Colony) अनधिकृतपणे सुरू असलेल्या दोन प्रार्थनास्थळांवरून तणाव निर्माण झाला.

सकाळ डिजिटल टीम

अनधिकृतपणे चालणाऱ्या प्रार्थनास्थळांबाबत विश्‍व हिंदू परिषदेने तक्रार दिली होती.

कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहतीत (Lakshtirth Colony) अनधिकृतपणे सुरू असलेल्या दोन प्रार्थनास्थळांवरून तणाव निर्माण झाला. धार्मिक वापर करता येणार नसल्याचे सांगत महापालिकेने ती बंद करण्यास भाग पाडले. कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे रंकाळा रोडपासून संपूर्ण लक्षतीर्थ वसाहतीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. यामुळे तणाव निर्माण झाला होता.

लक्षतीर्थ परिसरात रहिवासासाठी परवानगी आहे. गुंठेवारीतून अनेक मिळकती बांधल्या आहेत, तसेच अनेकांनी नियमितीकरणासाठी प्रस्ताव दिले आहेत; पण तेथील जागेचा धार्मिक वापर करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्‍यक आहे. ती नसताना लक्षतीर्थमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थनास्थळांकडून धार्मिक कार्य सुरू होते.

अशा अनधिकृतपणे चालणाऱ्या प्रार्थनास्थळांबाबत विश्‍व हिंदू परिषदेने तक्रार दिली होती. त्यानुसार महापालिकेच्या नगररचना विभागाच्यावतीने नोटीस बजावल्या होत्या. त्याचा कालावधी संपल्यामुळे आज कारवाई करण्याचे नियोजन केले होते. नोटिशीनंतर काल झालेल्या बैठकीत धार्मिक वापर बंद करत असल्याचे लेखी पत्र प्रार्थनास्थळांकडून दिले होते.

नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील भाईक, चेतन आरमाळ हे दोन्ही प्रार्थनास्थळात गेल्यानंतर तेथील वापर बंद असल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्यावतीने पंचनामा करण्यात आला व प्रार्थनास्थळांना कुलपे लावण्यात आली. पक्के बांधकाम केलेल्या प्रार्थनास्थळातील नागरिकांनी धर्मादाय विभागाकडून परवानगी घेतली आहे. तसेच गुंठेवारी नियमितीकरणासाठी प्रस्ताव सादर केला आहे, असे सांगण्यात आले. धार्मिक वापर केला जाणार नाही, असेही सांगितले. त्यानुसार दोन्‍ही ठिकाणांमधील काही साहित्य बाहेर काढून कुलूप लावण्यात आले.

बंदोबस्तामुळे वातावरण तापले

रंकाळा रोडवरून लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणाऱ्या टेंबलाई मंदिरापासून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विविध १५ ठिकाणे निश्‍चित करून तिथे पोलिस तसेच बॅरिकेडस्‌ ठेवण्यात आली होती. स्त्री-पुरुष असे १५० पोलिस हेल्मेटसह तैनात होते. प्रार्थनास्थळांकडे वाहने जाऊ नयेत, यासाठी रस्ते बॅरिकेडस्‌ लावून बंद करण्यात आले होते. यामुळे मोठी कारवाई असल्याचे समजून वातावरणात तणाव निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT