Dhairyasheel Mane esakal
कोल्हापूर

'आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल तर..'; मानेंविरोधात शिवसैनिक आक्रमक

'धैर्यशील मानेंनी गद्दारी का केली? याबाबत त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.'

सकाळ डिजिटल टीम

'धैर्यशील मानेंनी गद्दारी का केली? याबाबत त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.'

कोल्हापूर : शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात शिवसैनिकांत (Kolhapur Shiv Sena) तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापुरातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Muralidhar Jadhav) यांनी बंडखोर खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. येत्या 25 तारखेला आपण हजारो शिवसैनिकांना घेऊन माने यांच्या घरावर मोर्चा काढणार आहे, अशी भूमिका जाधव यांनी घेतलीय.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी धैर्यशील माने आणि आदित्य ठाकरे यांच्यात कधीही फरक केला नाही. पोटच्या मुलाप्रमाणं त्यांचा मान-सन्मान केला. त्यामुळं धैर्यशील माने वाटेल तेव्हा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांना भेटायला जात होते. त्यांना लागेल तसा निधी उद्धव ठाकरेंकडून दिला जात होता. तरीसुद्धा माने यांनी गद्दारी केली. त्यामुळं येत्या २५ तारखेला मी तमाम शिवसैनिक आणि मतदारांना घेऊन धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

धैर्यशील मानेंनी गद्दारी आणि बंडखोरी का केली? याबाबत त्यांना जाब विचारल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही जाधव यांनी दिलाय. आम्ही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळं आमच्यासमोर तुम्ही केंद्रीय दल आणा किंवा इतर कोणतंही दल आणा, हा बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. तो कुणाला घाबरत नाही. आम्ही काही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही आणि शिवसेना आमची आई आहे. आमच्या आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल, तर आम्ही ते उघड्याडोळ्यांनी पाहू शकत नाही. जशास तसे उत्तर देणार, असा गर्भित इशाराही जाधव यांनी माने यांना दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : जसप्रीतने नव्या चेंडूने गोलंदाजी का केली नाही? हार्दिकचे चकीत करणारे विधान; म्हणाला, ती माझी समस्या नाही

IPL 2026 Point Table: तिलक वर्माचे शतक अन् गोलंदाजांची कमाल... मुंबई इंडियन्सची GT च्या घरी धमाल; गुणतालिकेत मोठी झेप

Pune News : स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंनी दिली अतिरिक्त आयुक्तांना धमकी; सर्वसाधारण सभेत घडला प्रकार

BIGG BOSS Marathi: बिग बॉसच्या घरात तन्वी खरंच स्मोकिंग करायची का?, जिंकल्यानंतर म्हणते, बघितलं का?...

Pune Water Cut News: पुण्यात गुरुवारी २४ तास पाणीपुरवठा बंद; बहुतांश भागात शुक्रवारीही उशिरा व कमी दाबाने पाणी

SCROLL FOR NEXT