Music journey viki mohit Establishment of Flying Band positive story in kolhapur 
कोल्हापूर

मित्रांची मिळाली साथ अन् विकी-मोहित जोडीने गीतांना दिला ‘बेधुंद’ संगीतसाज

आकाश खांडके

टेंबलाईवाडी (कोल्हापूर) : गिटारिस्ट म्हणून त्याने संगीत प्रवास सुरू केला. पुढे विविध वाद्यांचे धडे घेतले. पाच मित्रांच्या साथीने ‘उडान बॅंड’ची स्थापना केली, संगीतकारांच्या हाताखाली काम करत स्वतः संगीत निर्मितीची सुरुवात केली. ‘विकी-मोहित’ जोडीने नामांकित संगीत कंपनीबरोबर ‘बेधुंद’ गाण्याची निर्मिती केली. सध्या ते दोन मराठी चित्रपट संगीतबद्ध करत आहेत.


जोडीतील मोहित कुलकर्णी सायबर परिसरात राहतो. लहानपणापासूनच संगीताची आवड. आई, बहिणीचे गायन ऐकतच तो मोठा झाला. त्याने दहावीत गिटारचे धडे घेतले. लंडनच्या नामांकित संगीत शाळेतून ऑनलाइन पद्धतीने गिटारच्या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला. पुण्यात त्याने 
तबला, पियानो वादनाचे प्रशिक्षण घेतले. पुढे त्याने पाच मित्रांच्या साहाय्याने उडान नावाचा रॉक बॅंड सुरू केला. यात तो स्वतः मुख्य गिटारिस्ट आहे. या बॅंडने नामांकित गायक अवधूत गुप्ते यांच्याबरोबर सादरीकरण केले आहे.


हे सुरू असताना स्वतःची धून तयार करण्याची कल्पना चमकली. तो विकी वाघ या मित्राबरोबर मिळून गाण्यांची रचना करू लागला. विकीचे शब्द आणि त्याचे संगीत ही केमिस्ट्री चांगलीच जुळली. एका नामांकित संगीत कंपनीसाठी त्यांनी बेधुंद नावाचे गाणे निर्मित केले असून, ते यूट्यूबवर आहे.संगीत क्षेत्राचा परिचय होण्यासाठी त्याने मुंबईमध्ये दोन वर्षे काम केले. संगीत अभियंता ही पदवी मिळवली. कलेला तांत्रिक शिक्षणाची जोड मिळाल्यामुळे संगीताचे विविध पैलू अवगत झाले. संगीतकार म्हणून त्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 लहानपणापासून संगीताची आवड असल्याने मी या क्षेत्रात आलो. लोकांना माझे संगीत आवडते याचा आनंद होतो. बेधुंद गाण्याने मला प्रसिद्धी मिळाली.
- मोहित कुलकर्णी


संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT