कोल्हापूर : सार्वजनिक नवरात्रोत्सव साधेपणाने करण्याचा निर्णय शहरातील बहुतांश मंडळांनी घेतला आहे. शहरातील ठिकठिकाणच्या पोलिस ठाण्यांत घेतलेल्या बैठकीत हा निर्णय झाला. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी हद्दीतील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. तीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची माहिती सर्वांना दिली.
नवरात्रोत्सवात कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी. सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स, मास्क यांबाबतचे नियम पाळावे, तसेच सार्वजनिक उत्सव म्हणून मिरवणुका आणि सामूहिक आरती करू नये, अशी विनंती पोलिस निरीक्षक जाधव यांनी केली. हद्दीत 41 मंडळे असून, त्यापैकी सुमारे 35 मंडळांचे कार्यकर्ते, तर 14 मंडळांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. यात बहुतांश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यंदा उत्सव सार्वजनिक करणार नसल्याचे जाहीर केले. काहींनी केवळ मूर्तीची प्रतिष्ठापना करून पाच लोकांद्वारेच दैनंदिनी धार्मिक कार्यक्रम केले जाणार असल्याचे सांगितले.
बैठकीसाठी रामानंदनगरातील बालाजी पार्क मित्रमंडळ, जोतिबा रोडवरील जोतिबा मित्रमंडळ, गुजरी कॉर्नर येथील शिवप्रेमी आझाद मंडळ, सुभाष रोडवरील विश्वशांती तरुण मंडळ, शिवाजी पेठेतील महाकाली मंदिर मंडळ, ओंकार ग्रुप, फिरंगाई तालीम मंडळ, नाथागोळे तालीम मंडळ, संभाजीनगर येथील सनी स्पोर्टस्, मंगळवार पेठेतील बालाजी ग्रुप (कोष्टी गल्ली), पद्मावती मंदिर, टिंबर मार्केटमधील श्री कोल्हापूर पाटीदार समाज भवन, आंबेडकर नगरातील जयभीम तरुण मंडळ, सुबराव गवळी तालीम मंडळ, सोल्जर ग्रुप, तटाकडील तालीम मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कार्यकर्त्यांची बैठक झाली. तेथेही बहुतांश मंडळांनी साधेपणाने उत्सव करणार असल्याचे सांगितले. अशाच पद्धतीने शहरातील सर्वच ठाण्यांत कार्यकर्त्याच्या बैठका घेऊन प्रबोधन केले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.