NCP leader Uttam Patil esakal
कोल्हापूर

NCP Crisis : राष्ट्रवादीतील राजकीय भूकंपाचे कर्नाटकात हादरे; 'या' एकमेव नेत्यानं जाहीर केली भूमिका

राज्यात शिवसेनेनंतर (Shiv Sena) आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्याने राजकारण पुरते ढवळून गेले आहे.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या या घडामोडीतून उत्तम पाटील यांचा गट कोणती भूमिका घेणार यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत होत्या.

निपाणी : महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. राज्यात शिवसेनेनंतर (Shiv Sena) आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात फूट पडल्याने राजकारण पुरते ढवळून गेले आहे. पक्षाच्या फुटीनंतर कोणता नेता कोणत्या गटात? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

त्याप्रमाणे राष्ट्रवादीचा प्रत्येक नेता भूमिका स्पष्ट करत आहे. अशावेळी नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निपाणी मतदारसंघातून (Nipani Constituency) प्रथमच राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते घेत सर्वांचे लक्ष वेधलेल्या उत्तम पाटील (Uttam Patil) यांची भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

त्यानुसार उत्तम पाटील यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बैठकीला उपस्थित राहून तसेच त्यांची वैयक्तिक भेट घेतली. त्यामुळे उत्तम पाटील हे शरद पवार गटात राहणार असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात अजित पवार यांनी सुमारे 35 आमदारांसह अचानक भाजपला पाठिंबा देत भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

त्याचे प्रत्येक मतदारसंघात पडसाद उमटत आहेत. प्रत्येक मतदारसंघात राजकीय फेरमांडणी होण्याची शक्यता आहे. अशावेळी निपाणी मतदारसंघात गत विधानसभा निवडणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने अखेरच्या टप्प्यात त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली होती.

निवडणुकीत उत्तम पाटील यांच्यासाठी अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सहभाग घेतल्या. यातून वातावरण निर्मिती करण्यात त्यांना यश आले होते. अशावेळी उत्तम पाटील यांचा थोडक्यात पराभव झाला असला तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या या घडामोडीतून उत्तम पाटील यांचा गट कोणती भूमिका घेणार यासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. सोशल मीडियावरही निपाणी मतदारसंघात आता राष्ट्रवादी काय करणार? असे विचारले जात होते. मात्र, उत्तम पाटील यांनी यासंदर्भात कोणतेही आढेवेढे न घेता बुधवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार समर्थकांच्या बैठकीत सहभागी होऊन त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे सर्व प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant यांच्या कोर्टात हाय-व्होल्टेज ड्रामा! महिला वकीलाच्या कृतीमुळे कोर्ट मार्शलला बोलवावं लागलं; पुढचा घटनाक्रम धक्कादायक!

Maharashtra Weather Update : राज्यात थंडीची लाट ओसरली, मात्र गारठा कायम राहणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यांत कसे असेल हवामान?

Swami Samarth Video: स्वामी समर्थ महाराजांचा गूढ प्रवास! भारत खंडातून फिरताना तयार होतो 'ॐ' आकार... प्रत्येक भक्ताने वाचावी अशी माहिती

Putin India Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे आज दिल्लीत होणार आगमन ; दौऱ्याकडे जगाचे असणार बारीक लक्ष!

आजचे राशिभविष्य - 04 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT