Sharad Pawar visits Kolhapur esakal
कोल्हापूर

Sharad Pawar : 'बाप हा बापच असतो'; शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वीच कोल्हापुरात बॅनरबाजी, शक्तीप्रदर्शनाने वातावरण तापणार

शरद पवारांच्या दौऱ्यापूर्वी कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय.

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक चौकाचौकांत असे बॅनर लावण्यात आले आहेत.

Sharad Pawar visits Kolhapur : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून कोल्हापूर (Kolhapur) दौऱ्यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय. उद्या शुक्रवारी (ता. २५) कोल्हापुरात राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा होणार आहे.

यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) शहरात बॅनरबाजी केली आहे. "बाप हा बापच असतो," आणि "योद्धा पुन्हा मैदानात" असा मजकूर असलेलं बॅनर सध्या शहरात झळकू लागलंय. त्यामुळं या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेळाव्याची जय्यत तयारी सुरु आहे. प्रत्येक चौकाचौकांत असे बॅनर लावण्यात आले आहेत.

खासदार शरद पवारांचा असा असेल दौरा

शुक्रवारी (ता. २५) दुपारी २ वाजता सातारा येथून कोल्‍हापूरकडे प्रयाण. दुपारी साडेचार वाजता तावडे हॉटेल येथे पोहोचल्यानंतर तेथून ताराराणी चौकापर्यंत मोटरसायकल रॅलीने आगमन. हॉटेल पंचशील येथून दसरा चौक येथील सभेकडे ५ वाजून १५ मिनिटांनी प्रयाण. सभास्‍थळी ५.३० वाजता आगमन व रात्री हॉटेल पंचशील येथे मुक्‍काम.

शनिवारी सकाळी साडे नऊ ते ११ या वेळेत शिष्‍टमंडळांच्या भेटीगाठी, ११ ते ११.३० या वेळेत पत्रकार परिषद, १२ वाजता शाहू महाराज समाधीस्‍थळास भेट, १ ते २ या वेळेत जिल्‍हाध्यक्ष व्‍ही. बी. पाटील यांच्या निवासस्‍थानी राखीव, ३.३० ते ५.३० हिंद मजदूर सभा अधिवेशनास उपस्‍थिती (महासैनिक दरबार हॉल) व ६ वाजता पुण्याकडे प्रयाण.

ऐतिहासिक दसरा चौकात उद्या (शुक्रवारी) हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाहू महाराज हे असणार आहेत. दरम्यान, सभेपूर्वी तावडे हॉटेल ते ताराराणी चौकापर्यंत पवार यांच्या स्वागत रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी मंत्री बाळासाहेब पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT