कोल्हापूर

कोल्हापुरात खत दरवाढीविरोधात राष्ट्रवादीची निदर्शने

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तीव्र आंदोलनाचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : पेट्रोल - डिझेलसह शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केल्याच्या निषेधार्थ जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महाराणा प्रताप चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले. खतांची दरवाढ रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

निवेदनामध्ये म्हटले आहे, केंद्र सरकारने इंधन दरवाढीबरोबरच रासायनिक खतांच्या दरात वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 10:26:26 : या खताची किंमत 600 रूपये तर डीएपी खतांची किंमत 715 रूपयांनी वाढवली आहे. यापूर्वी डीएपी हे खत 1185 रूपयांना मिळत होते, ते आता 1900 रूपयांना मिळणार आहे. याशिवाय पोटॅशच्या किंमतीतही वाढ केली आहे.

रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजप सरकारने केले आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी अगोदरच अडचणीत असताना आता खतांचे दर स्थिर ठेवणे व त्यापेक्षा ते कमी करणे आवश्यक होते. मात्र तसे न होता दरवाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ही दरवाढ तत्काळ रद्द न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे .

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, आर.के.पोवार, अनिल साळोखे, सुनील देसाई, मधुकर जांभळे, आदिल फरास, प्रताप उर्फ भैया माने, सुहास साळोखे, जयकुमार शिंदे, रमेश पोवार यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT