Kolhapur news 
कोल्हापूर

कोल्हापूर : NDRF कडून ६०० जणांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर

साखर कारखान्याच्या शेड्समध्ये दिला तात्पुरता आश्रय

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोल्हापूर जिल्ह्यात जिथं पुराचा जोरदार फटका बसला आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बलाची (NDRF) टीम पोहोचली असून मदत कार्य सुरु झालं आहे. NDRFच्या जवानांनी पूराचा फटका बसलेल्या ६०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केलं आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडीत गंभीर पूर परिस्थितीत NDRFच्या पथकाकडून मदत व बचाव कार्य सुरु आहे. (NDRF relief work begins in Kolhapur 600 people evacuated aau85)

पूराचा फटका बसलेल्या या ६०० नागरिकांना साखर कारखान्यातील मोकळ्या शेड्समध्ये तात्पुरते स्थलांतरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील राजापूर आणि कुरुंदवाड गावांमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने या गावांना मोठा फटका बसला.

दरम्यान, ब्लॉक व्यवस्थापकांच्या मदतीनं NDRFच्या टीमनं तीन गावातील नागरिकांची पूराच्या पाण्यातून सुटका केली आहे, अशी माहिती NDRFचे निरिक्षक शिवप्रसाद यांनी दिली. अद्यापही पूराचा मोठा फटका बसलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी NDRFचं काम सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rains Chaos: एका पावसात महाराष्ट्र ठप्प, १२ वर्षांचा हिशेब कोण देणार? सुप्रिया सुळे यांचा भाजप सरकारवर पर्यावरण व पायाभूत सुविधांबाबत जोरदार निशाणा

Manipur Attack: उग्रवाद्यांचा घातकी हल्ला! आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद; अनेक जण जखमी, मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा चिंताजनक

Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले

Ram Mandir Trust: कोण आहेत कृष्ण मोहन? राम मंदिर ट्रस्टची जबाबदारी सांभाळणार; 'या' 10 मुद्द्यांवर बैठकीत चर्चा

Pune Rains: पुण्यात संततधार पावसाचा तडाखा; २४ तासांत ८३, सहा दिवसांत १६३ झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT