Need to make children strong 
कोल्हापूर

शिवधनुष्य सशक्त पिढी घडविण्याचे

अॅड. पृथ्वीराज कदम

खरंतर मनुष्य हा समाजशील प्राणी असल्याने समाजात राहणे अनिवार्य आहे. एक चांगला समाज घडवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होणे गरजेचे आहे, त्यापैकी एक म्हणजे मुलांना म्हणजेच पुढच्या पिढीला सामाजिक बनवणं गरजचे आहे. समाज बदलतोय, ग्रामीण भागापासून मोठ्या शहरापर्यंत कुटुंबाची व्याख्या बदलत चाललेली आहे. एकत्र कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली आहे. आधुनिक जीवनशैली, भौतिक गरजामुळे प्रत्येक जण समाजापासून भावंडा पासून दुरावत चाललेला आहे.

विभक्त राहिल्याने कौटुंबिक स्वातंत्र्य व स्वायतत्ता मिळत असली तरी त्यामुळे होणाऱ्या नजीकच्या फायद्यापेक्षा भविष्यातील तोट्यांचा विचार करणं सामाजिक गरज बनलं आहे. सामाजिक बांधिलकी जोपासणा-या मुलांची फळी आता तयार करायला हवी. सिबलींग्ज म्हणजेच भावंडांमध्ये प्रेम, जिव्हाळा,आपुलकी असणे काळाची गरज बनली आहे. विभक्त आणि स्वातंत्र्याच्या सोयीने केलेल्या व्याख्येमुळे आज आपण नाती तोडून कौटुंबिक संकटांना एकट्याने सामोरे जात आहोत आणि त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तणावपूर्ण वातावरणात, भावनिक व शारीरिक संघर्ष करावा लागतो आणि न पेलवणाऱ्या संकटात एकटे पडून डिप्रेशनचे शिकार व्हावं लागतं. आपल्या लहानग्याचे भाऊ-बहीण किंबहुना मित्र महत्त्वाची भूमिका बजावत असतात. भावंडांना सपोर्ट करणं, वेळ प्रसंगी मदत करणं, धीर देणं, प्रेम करनं, प्रोटेक्ट करणं या सगळ्या गोष्टी भावंडे करतात. त्यामुळे मुलांना कधीही त्यांच्या चुलत किंवा नात्यातील भावकीतील इतर भावंडं पासून दूर करू नये, नात्यातील इतर मुलांमुळं,  त्यांच्या बरोबरील रिलेशनशिपमुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो. त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं, त्यांना जीवनातील येणाऱ्या संकटांशी आत्मविश्वासानं झुंजायचं बळ मिळतं. सर्वेक्षणातून उमगलं जी मुलं त्यांच्या भावंडांसोबत भावनिकरीत्या जवळ आहेत ती समाधानी, सकारात्मक राहतात आणि डिप्रेशनच्या विकारापासून दूर असतात. मुलांना भावंडांबद्दल जिव्हाळ्याने, प्रेमाने, निस्वार्थी, निरपेक्ष भावनेनं जगायला शिकवायला हवं. 
आज-काल मूलं सोशल मीडिया, गेम्स अशा व्हच्यूअल रियालिटीच्या आहारी गेलेले दिसून येतात. त्यामुळेच तानतणाव, बालगुन्हेगारी, लहानग्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. कित्येक मुलं एकाकीपणाची भावना व मानसिक समस्येमुळे मानसोपचार घेत आहेत. अशा प्रकारच्या सामाजिक समस्या वाढत आहेत. मुलांच्या मनामध्ये स्त्रीविषयी सन्मान ठेवण्याची भावना लहानपणापासून रुजली तर स्त्रीयांबाबत गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होऊ शकते.

आजची मुलं ही उद्याची राष्ट्राची भविष्ये आहेत. त्यामुळे मुलांना घडविणं, त्यांच्यात सामाजिकतेची बीजं रोवने महत्त्वाचं आहे. चांगला समाज घडविण्यासाठी  “मुलांमध्ये सामाजिक भावना हवी, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” ही भावना हवी तरच आदर्श समाज घडू शकेल आणि त्यासाठी स्त्रीला शिवबाला घडवणारी जिजाऊ बनावं लागेल. 
                                 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT