Neet entrance exam on 13th September Due to the public curfew there is tension among the examinees and parents to reach the examination center 
कोल्हापूर

...त्यामुळे नीटच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट प्रवेश परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेरीस १३ सप्टेबंरला होत आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सहा तालुके आणि तीन नगरपालिका हद्दीत जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जनता कर्फ्यूमुळे परीक्षा केंद्रावर पोचण्याचे टेन्शन परीक्षार्थी व पालकांना आले आहे. 


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा रद्द झाल्या आहेत किंवा लांबणीवर पडल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर काही ना काही अफवा सतत सोशल मीडियावरून पसरत होत्या. याचा सर्वाधिक त्रास अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असणाऱ्या जेईई व नीटची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना झाला. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्र सरकारने १३ सप्टेंबरला नीटची परीक्षा होत आहे. ही परीक्षा ३ मे ला होणार होती. परीक्षेपूर्वी एक ते दीड महिन्यात खासगी क्लासेसमधून या परीक्षेचा कसून सराव करून घेतला जातो.

मात्र लॉकडाऊनमुळे क्लासेस बंद झाले आणि विद्यार्थ्यांच्या तयारीला ब्रेक लागला. शहरी भागात ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थोडीफार तयारी करता आली ; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन सुविधे अभावी तयारी करता आली नसल्याचे विद्यार्थी सांगतात. एकीकडे परीक्षेच्या तयारीचे टेंशन तर नीट परीक्षा होणार - नाही होणार अशा द्वीधा मनस्थीत विद्यार्थी सहा महिन्यापासून आहेत. अशा परिस्थितीत अखेरीस १३ सप्टेंबरला परीक्षा घेण्याचे केंद्राने जाहीर केले आणि विद्यार्थ्यांनी रात्र-दिवस अभ्यासाला सुरवात केली. मात्र आता कोल्हापूरातील विद्यार्थ्याना परीक्षा केंद्रावर पोहचण्याचेच टेन्शन आले आहे. 


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील सहा तालुके आणि तीन नगरपालिका हद्दीत जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे. नीटची परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे व त्यांचे सध्याचे राहायचे ठिकाण दूर आहे. अशावेळी कोरोनाचा धोका टाळत, त्यांना सुरक्षितपणे परीक्षेला पोहचायचे, या चिंतेत असतानाचा जनता कर्फ्यूने विद्यार्थी व पालकांच्या चिंतेत भर टाकली आहे.

विद्यार्थी व पालकांमध्ये परीक्षा व जनता कर्फ्यूमुळे अतिशय चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.
प्रा. ए. बी. पाटील, प्राचार्य, डी. वाय. पाटील ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT