new 46 corona positive cases in kolhapur district
new 46 corona positive cases in kolhapur district 
कोल्हापूर

ब्रेकिंग - कोल्हापुरात कोरोनाच कहर सुरूच सायंकाळपर्यंत ४६  जणांना लागण 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोरोनाचा विळखा शहर आणि जिल्ह्यात आणखी घट्ट होऊ लागला आहे. काल दिवसभरात तब्बल १९७ जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आज सायंकाळपर्यंत आणखी ४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता एक हजार ५७६ झाली आहे. 


दरम्यान, गेल्या तीन महिन्यांत प्रथमच  काल दिवसभरात शंभराहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली. सर्वांनीच अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. दुसरीकडे दिवसभरात २० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या. अशा व्यक्तींची संख्या ८९८ इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात लॉकडाउन काटेकोरपणे असताना नियंत्रणात असलेला संसर्ग लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर वाढू लागला आहे. पहिल्या दोन महिन्यांत मुंबई व पुण्यात बहुतांश व्यक्ती परवानगी घेऊन जिल्ह्यातील मूळगावी आल्या. पैकी शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, आजरा, भुदरगड अशा डोंगरी तालुक्‍यांत सर्वाधिक पॉझिटिव्ह सापडले. याच काळात सोलापुरातून इचलकरंजीत आलेल्या व्यक्तीही पॉझिटिव्ह आल्या, तसे इचलकरंजी, शिरोळात कोरोना वाढला.  

या सर्वांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातून प्रभावी उपचार झाल्याने कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले. उपचार घेणारे कोरोनाग्रस्त फक्त ३५ होते. मात्र, गेल्या २० दिवसांत आकडा झपाट्याने वाढत आहे. आज त्याचा कहर झाला आणि धडकी भरण्याची वेळ आली. जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजार ५३० पोचली. यातील २२ जणांची प्रकृती गंभीर आहे. 

जिल्ह्यातील सहा शासकीय रुग्णालयांत ५८० कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. क्वारंटाईनपैकी ८०० व्यक्तींचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत झालेल्या आरोग्य तपासणीत ७५० व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. 

 सोळा वर्षीय मुलासह इचलकरंजीत दोघांचा मृत्यू
दिवसभरात १६ वर्षांच्या मुलासह दोघांचा काल कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १६ झाली आहे. शहरात मंगळवारी चौघाजणांचा मृत्यू झाला होता. काल सांगली रोडवरील पाटील मळा परिसरातील ७८ वर्षीय वृद्धाला अस्वस्थ वाटू लागले. त्यांना आयजीएममध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्व नियम पाळून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

लिगाडे मळा येथील १६ वर्षांच्या मुलाला तापात झटके येत होते. त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांपूर्वी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचा आज उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. त्याच्यावर मिरज येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

संपादन - धनाजी सुर्वे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: पुनरागमन करताच मॅक्सवेलचा गुजरातला मोठा दणका! कर्णधार शुभमन गिलला धाडलं माघारी

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT