new 90 corona patient found and relief covid 19 107 then total count 27 thousand 900 in kolhapur  
कोल्हापूर

कोल्हापूरात नविन 90 कोरोना बाधित तर 107 जण मुक्त 

शिवाजी यादव

कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी रात्री बारापासून आतापर्यंत 90 नवीन कोरोनाबाधित सापडले आहेत. तर जवळपास 107 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. गेल्या 48 तासात 762 व्यक्ती कोरोनाबाधित सापडल्या होत्या. त्यांच्यावर 14 कोवीड सेंटरमध्ये उपचार सुरू झाले आहेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 27 हजार 900 तर कोरोना मुक्तांची संख्या 17 हजार 400 झाली आहे. 


गेल्या महिन्यभरात बहुतांशी प्रमाणात कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ या भागातील कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. यातही जवळपास 167 व्यक्ती गंभीर आहेत. त्यांच्यावर सीपीआर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 
गेल्या महिन्यात आजरा, चंदगड, गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा या डोंगरी तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या जास्त होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यात बऱ्या पैकी यश आले आहे असे असताना आजरा, राधानगरी तालुक्‍यात गेल्या 24 तासात आणखी 100 बाधितांची भर पडल्याने या भागात चिंता पून्हा वाढली आहे. 
ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. मात्र यात 90 टक्‍क्‍या पेक्षा अधिक व्यक्ती सौम्य व मध्यम लक्षणे असल्याने त्यांना अवती भोवतीच्या तालुका कोवीड सेंटर मध्ये उपचार केले जात आहेत. 

गंभीर अवस्थेतील मोजक्‍याच व्यक्ती गंभीर आहेत. त्यांना मात्र सीपीआरकडे पाठविले जात आहे असे असूनही सीपीआर मध्ये 448 बेड आहेत. यातील आज वीस बेड रिकामे झाले होते. त्यावर नवे बाधित उपचारासाठी दाखल झाले. त्यामुळे सीपीआर पून्हा एकदा हाऊस फुल्ल होत आहे. नव्याने येणाऱ्या बाधितांवर किंवा गंभीर बांधितावर उपचार करण्यासाठी बेडची पयार्यी व्यवस्था करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिली. 


जिल्ह्यातील 14 शासकीय रूग्णालयात सकाळ पासून जवळपास 550 व्यक्तींचे नवीन स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. येत्या दोन दिवसात त्यांचे अहवाल मिळणार आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या आणखी वाढते की काय अशी शंकाही व्यक्त होत आहे. ज्यांची प्रकृती अधिक गंभीर आहे तर तसेच ज्यांना व्हेंन्टीलेटरची आवश्‍यकता आहे. अशातील अनेकांना मात्र व्हेन्टीलेटरची सोय मिळत नाही. शासनाने खाटांची माहिती फोनवर देण्याची सुविधा सुरू केली आहे. मात्र बहुतेक वेळा एखाद्या खासगी रूग्णालयात संपर्क साधण्यास सांगण्यात येते. मात्र तिथेही खाटां उपलब्ध होतात असे नाही किंवा झाल्या तरी बिल परवडणारे नसल्याने सर्वसामान्यांना रूग्णांना ससेहोलपट सोसावी लागत आहे. हे चित्र कायम आहे.  

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT