the new category of lotus found by two researchers in kashmir both are from kolhapur 
कोल्हापूर

कमळाच्या नव्या प्रजातीचा शोध ; कोल्हापुरच्या संशोधकांनी केले काश्मीर खोऱ्यात संशोधन

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : सुमारे दीडशे वर्षे 'निंफिया अल्बा व्हरायटी रुब्रा' अशा वनस्पती शास्त्रीय नावाने ओळखले जाणारे कमळाचे नाव ते नसल्याचे कोल्हापुरातील दोन वनस्पती शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. एवढंच नव्हे तर त्याला 'निंफिया खुरुई' हे नवीन नाव दिले. पन्हाळा येथील डॉ. मिलींद सरदेसाई आणि आणि राधानगरी तालुक्‍यातील डॉ. मयुर नंदीकर यांनी हे संशोधन केले आहे. सरदेसाई यांनी शोधलेली ही 23 वी प्रजाती आहे. काश्‍मिर खोऱ्यातील त्यांनी केलेल्या अभ्यासातून नुकताच या नवीन प्रजातीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

कमळाच्या जगभरात जवळपास 60 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यापैकी बहुतांश प्रजाती त्यांच्या मोठ्या आणि सुंदर फुलांसाठी लागवडी खाली आल्यामुळे जगभर पसरल्या आहेत. त्याचबरोबर काही प्रजाती तर पाणथळ प्रदेशातील स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमुळेही जगातील कानाकोपऱ्यात पसरलेल्या आहेत. भारतात कमळाच्या 20 प्रजाती आढळतात. त्यापैकी बहुतांश प्रजाती या हिमालयाच्या पूर्वेत्तर राज्यांमध्ये किंवा काश्‍मीरच्या खोऱ्यामधील पाणथळ परिसरात आहेत. युरोपात आढळणारी 'निंफिया अल्बा' आणि अमेरिकेतील 'निंफिया ओडोराटा' या दोन प्रजातींमधील नैसर्गिक संकर आहे. या संकरित प्रजातीला 'पिंक स्वीडिश', 'वॉटर लिली स्वीडिश', 'रेड वॉटर लिली' म्हणून स्थानिक नावानी ओळखली जाते. 

परंतु हे नाव त्याचे नाही हे डॉ. सरदेसाई आणि डॉ. नंदीकर यांनी सिद्ध केले आहे. नवरोजी गोदरेज सेंटर फॉर प्लांट रिसर्चचे वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून डॉ. मयुर नंदीकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून डॉ. मिलिंद सरदेसाई कार्यरत आहेत. त्यांनी सहा महिन्यांच्या अभ्यासातून सिद्ध केले आणि नुकताच न्यूझीलंडमधून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्‍सा ह्या जर्नलमध्ये ते प्रकाशित केले आहे. 

डॉ. अंझर खुरू याचे प्रजातीला नाव 

कमळाच्या प्रजातीला काश्‍मीर विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभागात परकीय तणांवरील आजवरील संशोधन कार्य सन्मानित करण्यासाठी अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. अंझर खुरू ह्यांचे नाव दोन वेगवेगळ्या जंगली प्रजातींचा नैसर्गिक संकर असणाऱ्या या प्रजातीला दिले आहे. 

"आठ-दहा महिन्यापूर्वी काश्‍मीर खोऱ्यातील दल सरोवरात कमळ मिळून आले. त्यांनी त्याचे पृथ्थकरण केल्यानंतर त्याला युरोपीय खंडात स्थानिक भाषेत, वेगळीच नावे असल्याचे दिसून आले. मात्र ते कमळ हे नसल्याचे अभ्यासात दिसून आले. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने सर्व प्रक्रीयापूर्ण करून या नावावर ऑक्‍टोबर मध्ये शिक्कामोर्तब झाले."

 - डॉ. मिलींद सरदेसाई  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Alert : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, 48 तास कोसळणार धो-धो पाऊस; दिवाळीपर्यंत पाऊस राहणार?

Latest Maharashtra News Updates : कुख्यात गुंड छोटा राजनचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Navratri festival: '६०० वर्षांपूर्वीचे दुर्मिळ अलंकार रुक्मिणी मातेला परिधान करणार'; पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी

Pune Grand Challenge : सायकल स्पर्धा; दर्जेदार रस्त्यांचे आव्हान, नोव्हेंबरपर्यंत कामे करावी लागणार पूर्ण; अटीशर्तींवरून आरोप

केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमीबाचं थैमान, आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू; कसा होतो संसर्ग?

SCROLL FOR NEXT