कोल्हापूर: स्टील दरात पंधरा दिवसांत ५०, तर वर्षात ९० टक्के दर वाढीमुळे फ्लॅट किंवा घराचे नव्याने बुकिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी प्रती चौरस फूट ४०० ते ५०० रुपयांनी दर वाढणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाले वा पूर्णत्वाकडे आहेत. त्यांच्याकडून साधारण १०० ते ४०० रुपयांपर्यंत वाढ होईल, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, सिमेंटचा मागील वर्षाचा दर प्रतिबॅग २५० होता, तो आज ३७० म्हणजे ४८ टक्क्यांनी वाढला आहे. अशीच स्थिती टाईल्स आणि इतर बांधकाम साहित्यात आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही दरवाढ करावी लागणार आहे. कोविडनंतर बांधकाम व्यवसायिकांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली तरीही दरवाढ केली नाही. मात्र, आता साहित्याचे दर वाढल्यामुळे ही दरवाढ करावी लागत आहे. दरवाढ टाळण्यासाठी देशपातळीवर संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. (New flat booking will be expensive; Consequences of rising steel prices)
दरवाढीवर सरकारसह अन्य कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे ही स्थिती उत्पन्न झाल्याचीही माहिती क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितली. उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव प्रदीप भारमल, खजानिस गौतम परमार, सहसचिव श्रीधर कुलकर्णी, सहखजानिस पवन जमादार, संचालक कृष्णात खोत, गणेश सावंत, लक्ष्मीकांत चौगुले उपस्थित होते.
पूर्वी बुकिंग केलेल्यांसाठी दरवाढ नाही-
रेरा कायद्यानुसार दिलेल्या वेळेत ताबा ग्राहकाला द्यावा लागतो. तेथे दरवाढ किंवा अन्य कारणे सांगून चालत नाहीत. ज्यांनी पूर्वी बुकिंग केले आहे, त्यांच्यासाठी ही दरवाढ नाही. मात्र, नव्याने बुकिंग करणाऱ्यांसाठी दरवाढ करावी लागणार आहे. प्रत्येक बांधकाम व्यावसायिक आणि त्यांचे प्रकल्प यावर ही दरवाढ अवलंबून आहे. ही दरवाढ सरसकट नसल्याचे बेडेकर यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.