new research of umadevi ghorpade in kolhapur on solar with nanoparticles in kolhapur
new research of umadevi ghorpade in kolhapur on solar with nanoparticles in kolhapur 
कोल्हापूर

नॅनो पार्टिकल्सचा वापर करून सोलर सेलची निर्मिती ; डॉ. उमादेवी घोरपडे यांचे संशोधन

नंदिनी नरेवाडी - पाटोळे

कोल्हापूर : सौरउर्जेतून मिळणारे इंधन भविष्यातील एकच पर्याय आहे. कोल्हापूरच्या डॉ. उमादेवी वसंत घोरपडे यांचेही संशोधन मोलाचे ठरणार आहे. त्यांनी नॅनो पार्टिकल्सचा वापर करून कमी खर्चात सोलर सेलची निर्मिती तसेच सौरउर्जेचा वापर करून ‘फोटोकाटॅलेटीक वॉटर स्पिलिंग’ या कृत्रिम प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेच्या माध्यमातून हायड्रोजन इंधननिर्मितीला चालना देणारे संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनामुळे पारंपरिक उर्जेचे जतन होण्याबरोबर प्रदूषणही टाळता येणार आहे. 

डॉ. उमादेवी या मूळच्या सांगली जिल्ह्यातील बेडग गावच्या. त्यांचे सासर तारदाळ. त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण विलिंग्डन महाविद्यालयात झाले. शिवाजी विद्यापीठातून रसायनशास्त्र  विषयातून त्यांनी एम.एस्सी.चे शिक्षण घेतले. ‘एक्‍स्चेंज स्टुडंट प्रोग्रॅम’ अंतर्गत पीएच.डी.साठी त्यांची निवड दक्षिण कोरियातील चोन्नम नॅशनल विद्यापीठात झाली. तेथे त्यांनी २०१३ ते २०१७ या कालावधीत इनऑरगॅनिक केमिस्ट्री (मटेरियल सायन्स) या विषयात संशोधन केले. त्यात नॅनोपार्टिकल्स आणि धातू-अधातूंचा वापर करून सोलर सेलमध्ये सौरऊर्जा खेचून घेण्याची क्षमता वाढविण्याबाबत संशोधनावर भर दिला.

त्यानंतर त्यांना आयर्लंडमधील सायन्स फाउंडेशनने पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप जाहीर केली. या फेलोशिपच्या माध्यमातून त्यांनी ‘मल्टिनरी कंपाउंड सिलिकॉन, जमॅनियम ॲण्ड टिन डिराव्हड नॅनोक्रिस्टल ः कंपोझिशन, शेप ॲण्ड हेटेरोस्ट्रक्‍चर कंट्रोल’ या विषयावर संशोधन केले. त्यांना प्रा. एस. एस. कोळेकर, प्रा. डे. एच. किम आणि प्रा. के. एम. रॉयन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, वडील वसंत व आई कांचन घोरपडे यांचा पाठिंबा मिळाला. 

इन्स्पायर फेलोशिप

डॉ. उमादेवी यांचे ३६ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय, त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. भारत सरकारच्या सायन्स आणि टेक्‍नॉलॉजी विभागाकडून इन्स्पायर फेलोशिप, शिवाजी विद्यापीठाचे सुवर्णपदक तसेच आयर्लंडमधील सायन्स फाउंडेशनकडून पोस्ट डॉक्‍टरल फेलोशिप मिळाली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT