new ten corona positive patient in kolhapur 
कोल्हापूर

ब्रेकिंग- कोल्हापुरात कोरोनाची शंभरी पार ; दिवसभरात 48 रूग्णांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - कोल्हापूर - कालपासून  जिल्ह्याला धक्यावर धक्के बसत आहेत. काल (ता. १७ ) १४ नव्या रूग्णांची भर पडल्यानंतर सोमवारी सांकाळपर्यंत तब्बल १८ रूवे रूग्ण सापडले होते. त्यानंतर नुकत्याच हाती आलेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात आणखी 28 जणांना कोरनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या या 48 रूग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना रूग्णांची संख्या आता 102 वर पोहोचली आहे. 

आता सापडलेल्या या रूग्णांपैकी पन्हाळा, कोल्हापूर शहर, हातकणंगले, करवीर आणि शाहुवाडी येथील एकाचा समावेश आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टीम रात्रभर कार्यरत

कोल्हापूर जिल्ह्यात आज एकाच दिवशी कोरोनाचे 48रुग्ण सापडले आहेत. बाधित रुग्णांचा संपर्क शोधण्यासाठी जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली 10 कर्मचाऱ्यांची टीम रात्रभर कार्यरत होती.

दरम्यान, आज कोल्हापुरात कोराचा दुसरा बळी गेला आहे. मुंबईतील विले पार्ले येथून येथील डाॕ. डी. वाय. पाटील रुग्णालयात आलेला ३५ वर्षीय तरुण आज पहाटे मृत झला. त्याचा स्वाॕबचा अहवाल आज पाॕझीटिव्ह आला, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॕ बी सी केम्पी-पाटील यांनी दिली.
 पन्हाळा तालुक्यातील मानवाड गावचा हा तरुण काल रात्री दहा वा  येथील डाॕ. डी. वाय. पाटील रुग्णालयात आला होता. तो आणि त्याच्यासोबत नऊजण सदस्य होते. रांगेत ते उभे असताना त्यांना टोकन देण्यात आले होते. 
  रात्री साडेअकराला आर टी पी सी आरचा सर्व्हर डाऊन झाल्याने रुग्णालयाच्यावतीने त्यांना थोडावेळ विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. पहाटे साडेतीन पावणेचारच्या  दरम्यान या तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्याने आणि श्वसनास त्रास होवून झटके येवू लागल्याने, त्याच्या भावाने त्याला रुग्णालयात आणले. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत झाला. रुग्णालयाच्यावतीने त्याचा स्वॕब घेण्यात आला होता त्याचा आज रात्री आठ वाजता पाॕझीटिव्ह अहवाल आला. त्याच्यासोबत असणाऱ्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांचेही स्वॕब घेण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT