nirbhaya pathak action on young boy in ichalkaranji 
कोल्हापूर

एसटीत मुलींची छेड काढणे चांगलेच पडले महागात

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : महाविद्यालयास येत असताना एसटी बसमध्ये टवाळखोरी करणार्‍या शिरोळ तालुक्यातील 22 युवकांना निर्भया पथकाने थेट पोलिस ठाण्यात नेले. संबंधीत सर्व युवकांच्या पालकांना बोलवून समज दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मात्र एसटीमध्ये टवाळखोरी करणार्‍या युवकांना चांगलाच चाप बसल्याची चर्चा आज शहरात होती.

दरम्यान, एसटीमध्ये टवाळखोरी करणार्‍या युवकांबाबत वाहकाने घेतलेल्या धाडसी निर्णयाचे कौतुक होत आहे. यापुढील काळातही चालक वाहकांबरोबर महाविद्यालयीन युवतीने तात्काळ निर्भया पथकाशी संपर्क साधल्यास अशा घटनांना आळा बसणार आहे. 
शिरोळ तालुक्यातील दत्तवाड, घोसरवाड, अब्दुललाट, शिरदवाड या मार्गावरून दररोज सकाळी बस येते. यामध्ये अधिकांश शाळकरी व महाविद्यालयीन युवक युवतींचा समावेश असतो. मुलांनी बसमध्ये आल्यानंतर दंगामस्ती करण्यास सुरवात केली. मुलींची छेडछाड करणे, बसमधील बेल वारंवार वाजविणे, विक्षिप्तपणे वर्तणूक करणे असे प्रकार सर्रासपणे सुरू होते. ही बाब वाहकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला. 

बस मध्यवर्ती स्थानकावर आल्यानंतर त्या ठिकाणी निर्भया पथकच्या प्रमुख सहाय्यक पोलिस निरिक्षक रूपाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुमक थांबून होती. बसमध्ये दंगा करणार्‍या युवकांना तात्काळ त्यांनी ताब्यात घेतले आणि थेट पोलिस स्टेशन गाठले. संबंधीत सर्व युवकांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी या युवकांना सज्जड दम देऊन पुन्हा असा प्रकार झाल्यास कडक कारवाईचा इशारा दिला. या कारवाईमध्ये अविनाश भोसले, व्ही. एम. शिंदे, एम. आर. कुलकर्णी, जे. एस. अकिवाटे यांनी भाग घेतला.


बसमध्ये युवकांनी छेडछाड अथवा अन्य प्रकार केल्यास तात्काळ निर्भया पथकास कळवावे. या युवकांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर अशा प्रकारांना आळा घालण्यास यापुढील काळात ठोस पाऊले उचलली जातील.
-रूपाली पाटील, निर्भया पथक प्रमुख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT