niwas watkar as vice president on kumbhi sugar mill 
कोल्हापूर

'कुंभी'च्या उपाध्यक्ष पदी निवास वातकर

नामदेव माने

कसबा बीड - कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी सांगरूळ येथील निवास निवृत्ती वातकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक उपसंचालक (साखर) एस.एन.जाधव होते. यावेळी अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रमुख उपस्थिती होती.

उत्तमराव वरूटे यांचा उपाध्यक्ष पदाचा कार्यकाल जूनमध्ये संपला होता. पण कोरोनामुळे निवड लांबली होती. उपाध्यक्ष पदासाठी संचालक जयसिंग ज्ञानदेव पाटील यांनी नाव सुचविले. त्याला आनंदराव पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी  बोलताना अध्यक्ष चंद्रदीप नरके म्हणाले, गेली नऊ वर्षे ऊसाला दर जास्त आणि साखरेला कमी अशी अवस्था आहे. त्यामुळे एफआरपी देण्यासाठी सर्वच कारखान्यांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावेळी पी.डी.पाटील, दादासाहेब लाड व अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व संचालक कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. निवडी नंतर उत्साही सांगरूळकरांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.

सांगरूळला तब्बल २६ वर्षानंतर संधी

राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या सांगरूळ गावाला तब्बल २६ वर्षानंतर चंद्रदीप नरके यांचे कट्टर समर्थक निवास वातकर यांना संधी मिळाली आहे. यापुर्वी मारूती खाडे यांनी तीन वेळा व भिवाजी खाडे यांनी एकदा व १९९४/९५ साली विश्वनाथ खाडे यांना संधी मिळाली होती. यामुळे सांगरूळ ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : अटल सेतूवर मराठा आंदोलक प्रचंड आक्रमक; पोलिसांशी चकमक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये गणेशोत्सवामुळे वाहतूक बदलाचे नियोजन; 'या' मार्गांवर 'नो एन्ट्री'

मराठा आरक्षणासाठी मुंबईत जरांगेंचं बेमुदत उपोषण; अमित शाहांची भेट घेऊन शिंदे लगेचच जाणार गावी, राजकीय चर्चांना उधाण

Heavy Rains: अकोला, वाशीम, यवतमाळात पाऊस सुरूच; कापूस, सोयाबीन, तूर पिकांना फटका, रस्ते आणि पूल पाण्याखाली

बापरे! जया बच्चनने पपाराझीसमोर केलं असं काय? की उपस्थितासह चाहते झाले शॉक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT