No marriage, then what is the confusion? 
कोल्हापूर

विवाहच नाही, मग गोंधळ कुठला ? 

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : ऐन लग्नसराईच्या काळातच कोरोनाला प्रारंभ झाला आणि विवाह सोहळ्यांवरच बंदी आली. त्याचा परिणाम लग्न सोहळ्यात मान असलेल्या बारा बलुतेदारांवर झाला आणि त्यातही सर्वाधिक फटका बसला तो गोंधळी समाजाला. बदलत्या काळाबरोबर हा समाजही बदलला.

पुढची पिढी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आली तरी परंपरा म्हणून अजूनही जिल्ह्यातील पाच ते सहा हजारांवर कुटुंबांचा आधार हीच लोककला आहे. मात्र, लॉकडाउनमध्ये कार्यक्रमाची एकही सुपारी नसल्याने त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. 

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात कमी-अधिक प्रमाणात समाज आहे. लग्नसराईतील उत्पन्न हाच प्रमुख आधार. जिल्ह्यातील गोंधळी समाजाला जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा परिसरातही मोठी मागणी असते. वैशाख महिन्यात तर समाजातील कलावंतांना जराशीही उसंत मिळत नाही. पूर्वी राजर्षी शाहूंनी समाजाला राजाश्रय दिला. त्यानंतर लग्नातील गोंधळाच्या निमित्ताने सुगीची परंपराही होती; पण तीही बदलली आणि आता ती फक्त शिध्यापुरतीच मर्यादित आहे. मात्र, कार्यक्रमाच्या सुपारीच्या म्हणजेच बिदागीच्या रूपाने मिळणारे आर्थिक उत्पन्न समाजाचा खरा आर्थिक स्त्रोत आहे. 

अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेचे जिल्हा संघटक संभाजीराव खाडे-गोंधळी सांगतात, ""महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीत गोंधळी आणि त्यांचा गोंधळ यांना मोठे महत्त्व आहे. काळ बदलला तरीही सध्याच्या समाजव्यवस्थेत गोंधळी समाजाला मान दिला जातो.

काही कलावंतांना शासनाचे मानधन मिळते; पण तेही वेळेत मिळत नाही. अजूनही अनेक कलावंत या लाभापासून लांबच आहेत. मात्र, यंदा कोरोनामुळे समाजातील साऱ्या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासकीय पातळीवर समाजासाठी काही सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. आर्थिक सहाय्याबरोबरच रेशनवरील धान्य व इतर सुविधा मिळाल्या, तर थोडा आधार मिळणार आहे. मात्र, त्यासाठी ओळख म्हणून ग्रामपंचायत वा पोलिसपाटील यांचा दाखला ग्राह्य धरावा, अशी मागणी आहे.'' 

विवाह सोहळेच रद्द झाल्याने पारंपरिक गोंधळ घालणाऱ्यांना यंदा चांगलाच फटका बसला. मात्र, लॉकडाउनमध्ये आम्ही नव्या पिढीला संबळ आणि इतर पारंपरिक वाद्ये शिकवण्याचा प्रयत्न केला. पुढच्या पिढीने ही परंपरा जपावी, हाच त्यामागचा उद्देश आहे. 
- मारुती गोंधळी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS: श्रेयस अय्यरने अफलातून कॅच घेतला, पण त्यामुळे करावं लागलं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं...

"मी लहान असताना माझे वडील वेगवेगळ्या रिलेशनशिपमध्ये.." बालपणाबद्दल हर्षवर्धनचा धक्कादायक खुलासा

Mohol Accident : एसटी बस व ट्रॅक्टरच्या अपघातात तिघे जण जखमी; एक जण गंभीर

Latest Marathi News Live Update : रिल बनवणं जीवावर बेतलं! रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Thane News: भिवंडीत दोन गटांत हाणामारी! माजी महापौरांसह ३० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT