no mask no access kolhapur pattern implement in maharashtra 
कोल्हापूर

जगात भारी कोल्हापुरी ; "मास्क नाही, प्रवेश नाही', मुंबईत झळकला कोल्हापूर पॅर्टन 

सुनील पाटील

कोल्हापूर : मास्क नाही, प्रवेश नाही. नो मास्क, नो ऐंट्री ही कोल्हापूरात सुरु झालेली मोहीम आता राज्यभर अवलंबली जात आहे. मुंबईतील प्रत्येक बसस्थानकावर नो मास्क, नो ऐंट्री, मास्क नाही, प्रवेश नाही असे फलक झळकू लागले आहेत.

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या कल्पनेतून ही मोहिम कोल्हापूर जिल्ह्यातील धान्य दुकान, कापड दुकान, शासकीय, खासगी कार्यालयात राबवली प्रभावीपणे राबवली जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा हाच कोल्हापूरी पॅर्टन आता मुंबईमध्ये सर्व बेस्ट बस स्थानकावर झळकू लागला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत होते. दिवसाला किमान 900 ते 1000 पर्यंत रुग्ण आढळत होते. आता यामध्ये घट होत असली तरीही काळजी आणि खबरदारी घेणे महत्वाचे आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर लोकांची गर्दी होतच राहिली आहे.

सर्वाधिक गर्दी धान्य दुकान, कापड दुकान, विविध कार्यालयामध्ये दिसून येत होती. यामुळे ज्या धान्य दुकानातील मालक किंवा त्याचे कामगार मास्क घालून धान्य वितरित करणार नाहीत, अशा दुकाना ग्राहकांनी साहित्य खरेदी करु नये. तसेच, जो ग्राहक मास्क घालून येणार नाही, त्याला धान्य विक्री करु नये, असे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील प्रत्येक दुकानात हे आदेश पोचवण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यात आता "मास्क नाही, प्रवेश नाही' ही मोहिम राबवली जात आहे. शासकीयसह खासगी कार्यालयातही "नो मास्क, नो ऐंट्री'असे फलक लावले जात आहेत. 

 तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी आवाहन केले जात आहे. मास्क वापरल्याशिवाय कोरोना रुग्णांची संख्या आटोक्‍यात येणार नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. तर तोंडाला मास्क वापरल्याशिवाय कोणाला दुकानातच नव्हे तर सर्व प्रकारच्या कार्यालयात प्रवेश देवू नये यासाठी ही मोहिम राबविण्यात आली आहे. चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरु केलेल्या "मास्क नाही, प्रवेश नाही' ही मोहिम आर्दवत आहे. राज्यभर ही मोहिम राबविण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार मुंबईत बेस्टकडून ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण; आठवड्याच्या पहिल्या दिवशी काय आहे 24 कॅरेट सोन्याचा भाव?

Kolhapur Crime: 'कुरुंदवाडात धारदार शस्त्राने युवकावर सपासप वार'; एकमेकाकडे खुन्नसपणे बघण्याच्या रागातून झाला वाद

Trimbakeshwar : पहिने धबधब्याला पर्यटकांची गर्दी; नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तुफान कोंडी

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nagpur Crime : निर्माल्य विसर्जनानंतर पतीसोबत काढला 'सेल्फी' अन् महिलेने नदीत मारली उडी; दोघांत असं काय घडलं?

SCROLL FOR NEXT