No one from the red zone including Pune-Mumbai has access kolhapur  
कोल्हापूर

पुण्या-मुंबईसह रेड झोनमधील एकालाही प्रवेश नाहीच...कुठे वाचा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  कोल्हापूर जिल्ह्यातील लॉकडाउन कायम असून, राज्य शासनाचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत दुकाने सुरू होणार नाहीत. पुण्या-मुंबईसह रेड झोनमधील एकाही व्यक्‍तीला कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी सायंकाळी दिली. जिल्ह्यातील परिस्थितीचा विचार करूनच कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच संबंधित येणाऱ्यांना इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

कोल्हापूर जिल्ह्यात असलेली इन्स्टिट्यूट क्वारंटाईनची स्थिती आणि त्याचा विचार करून इतर जिल्ह्यातील किंवा परराज्यातील व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील कोरोना संक्रमण वाढणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. इतर जिल्ह्यातील, परराज्यातील व्यक्ती कोल्हापुरात येण्यासाठी उत्सुक आहेत; मात्र पुण्या-मुंबईसह रेड झोन असलेल्या कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही. त्यासाठी आमच्याकडून परवानगीच दिली जाणार नाही. त्यामुळे ते कोल्हापुरात येऊ शकणार नाहीत. त्यांच्यामुळे जिल्ह्यातील कोरोना संक्रमण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कोल्हापुरात येण्यासाठी ज्या व्यक्तींना प्रवेश दिला जाईल, त्यांना सक्तीने इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्यांनाही व्यवस्था पाहून प्रवेश द्यावा लागणार आहे.'' 

केंद्र शासनाने लॉकडाउनमध्ये काही शिथिलता दिली आहे; मात्र त्या संबंधित राज्य शासनाचे कोणतेही आदेश सायंकाळी सातपर्यंत माझ्याकडे आलेले नाहीत. त्यामुळे रविवार (ता. 3) पासून कोणतीही शिथिलता कोल्हापूर जिल्ह्यात असणार नाही. सध्या सुरू असलेले लॉकडाउन कायम आहे. पुण्या-मुंबईसह रेड झोनच्या जिल्ह्यातील एकाही व्यक्तीला कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही. 
- दौलत देसाई, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

Crime: तुम्हाला गिफ्ट द्यायचंय सांगत डोळे अन् हात बांधले, नंतर...; वहिनीचे नणंदेसोबत धक्कादायक कृत्य

Sleeping With Sweater: हिवाळ्यातील मोठी चूक? झोपताना स्वेटर घालणाऱ्यांनी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा...

Junnar Leopard : बिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार; मानव-बिबट संघर्ष रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची खा. अमोल कोल्हे यांची मागणी!

मेस्सीला पाहायला आलेल्या चाहत्यांनी अचानक का केला मुंबई पोलिसांचा मोठा जयघोष? viral video पाहून तुम्हीही भांबावून जाल

SCROLL FOR NEXT