NOC 'No, now notice before foreclosure; Fatwa of Municipal Tax Department 
कोल्हापूर

एनओसी' नाही, आता जप्तीपूर्वी नोटीस ; महापालिकेच्या घरफाळा विभागाचा फतवा 

डॅनियल काळे

कोल्हापूर  : महापालिकेने जन्म-मृत्यूचे दाखले देताना घरफाळा विभागाची एनओसी घेण्याची अट रद्द करून दाखला दिल्यानंतर संबंधित नागरिकाची जर थकबाकी असेल, तर त्यांना जप्तीपूर्व नोटिसा देण्याचा आदेश सहायक आयुक्त विनायक औंधकर यांनी सर्व नागरी सुविधा केंद्रांना दिला आहे.

 
महापालिकेच्या घरफाळा विभागाचे उत्पन्नवाढ करण्यासाठी विविध उपाययोजना करताना डिसेंबर 2020 मध्ये जन्ममृत्यूच्या दाखल्याचा अर्ज करताना घरफाळा भरल्याची पावती आणि या विभागाचा नाहरकत दाखला बंधनकारक केला होता. या निर्णयाच्या उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.

महापालिकेकडे जन्म-मृत्यूचे दाखले मागण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकही येतात. भाड्याच्या घरात राहणारेही नागरिक असतात, पण महापालिकेच्या या निर्णयाने ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही. त्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे नागरी सुविधा केंद्रात नागरिक आणि कर्मचारी यांच्यात खटके उडत होते. 

याबाबत माजी नगरसेवक ईश्‍वर परमार यांनीही दाखल्यासाठी ना हरकतची अट रद्द करण्याची मागणी केली होती. नागरी कृती समितीनेही सहायक आयुक्तांच्या आदेशाची महापालिका चौकातच होळी केली होती. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे तक्रारीही झाल्या होत्या. 

या पार्श्‍वभूमीवर सहायक आयुक्त औंधकर यांनी नागरिकांना जन्म मृत्यूचा दाखला देताना घरफाळा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट रद्द केली आहे, पंरतु नागरी सुविधा केंद्राकडून दाखले देणाऱ्या नागरिकांची यादी घरफाळा विभागाला दर आठवड्याला देण्याच्या सूचना केल्या आहेत. घरफाळा थकीत असेल तर त्यांना मात्र थेट जप्तीपूर्व नोटीस धाडली जाणार आहे. अशाप्रकारची कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: राजकारणात मोठा ट्विस्ट! काकांनी नाकारलं; पवार–शिंदे युतीमुळे नवं समीकरण तयार होणार? पुण्यात पडद्यामागे घडामोडी

Smith Surpasses Dravid: ऑस्ट्रेलिया 'बॉक्सिंग डे' टेस्ट हरले, पण कर्णधार स्मिथने द्रविड-कोहलीला मागे टाकत रचले मोठे विक्रम

Aaditya Thackeray : "एका झाडालाही हात लावू देणार नाही"; तपोवनातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरे आक्रमक!

‘तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी’ चित्रपट निराशाजनक, विस्कळित कथेमुळे प्रेमाची जादू हरवली

Nagpur Municipal Election : ...तर एकत्र लढणार ‘महाविकास आघाडी’; काँग्रेसकडून ३२ जागा सोडण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT