Now The Bank's Transactions Will Be Done At The Village Level Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

आता बॅंकेचे व्यवहार होणार गावस्तरावर...!, सविस्तर वाचा काय आहे योजना...

अवधूत पाटील

गडहिंग्लज : बॅंकेचे काम म्हटले की, तालुक्‍याची, नाही म्हटले तरी शाखा असणाऱ्या गावाची फेरी ठरलेलीच. त्यातही महिलांनी व्यवहार करायचे म्हटले तर अनेक अडचणी. पण, आता बॅंकेचे व्यवहार गावस्तरावरच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अंतर्गत बीसी (व्यवसाय प्रतिनिधी) सखींना ही जबाबदारी दिली जाणार आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि बारटॉनिक या संस्थेच्या माध्यमातून येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथे जिल्ह्यातील पहिल्या बीसी सखीची नियुक्ती झाली आहे. महिला बचत गटासह ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार असून वेळ आणि पैशाचा अपव्यय टळणार आहे. 

बॅंकेच्या व्यवहारासाठी जायचे म्हणजे वेळ जातो. बचत गटातील महिलांना व्यवहार करण्यासाठी अजून अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य जिवनोन्नती अभियान अंतर्गत बीसी सखींची नेमणूक करण्याचे धोरण आखले आहे. बीसी सखींतर्फे गावस्तरावरच बॅंकेचे व्यवहार करता येणार आहेत. वैयक्तिक बॅंक खाते उघडण्यापासून पैशाचे व्यवहार करता येणार आहेत. सर्व शासकीय विमा योजनांची कामेही त्यांच्याकडून केली जाणार आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या बीसी सखीची नेमणूक येणेचवंडी (ता. गडहिंग्लज) येथे झाली आहे. राजलक्ष्मी बिरंजे यांना जबाबदारी दिली आहे. टप्प्याटप्प्याने अन्य ठिकाणीही बीसी सखींची नियुक्ती केली जाणार आहे. सध्या बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ होणार आहे. लवकरच अन्य बॅंकाही जोडल्या जाणार आहेत. 

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत बिरंजे यांना पॉज मशिन देण्यात आले. पंचायत समितीच्या सभापती रूपाली कांबळे, उपसभापती श्रीया कोणकेरी यांच्या हस्ते वितरण झाले. सदस्य विद्याधर गुरबे, विठ्ठल पाटील, बनश्री चौगुले, इंदू नाईक, गटविकास अधिकारी शरद मगर, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्‍वर, तालुका अभियान व्यवस्थापक दयानंद पाटील, बारटॉनिकचे मोहन साळुंखे, प्रभाग समन्वयक भीमसेन चौगुले, महादेव गुरव, प्रदीप परीट आदी उपस्थित होते. जिवनोन्नती अभियानचे सहसंचालक रवी शिवदास, सचिन पानारी, सम्राट पोतदार राजू सदलगे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

ग्रामसंघाकडून कर्जपुरवठा... 
बॅंकेचे व्यवहार करण्यासाठी बीसी सखींना पॉज मशिन गरजेचे होते. त्याची रक्कम 26 हजार 500 इतकी आहे. ही रक्कम उभा करणे अडचणीचे होते. विशेष म्हणजे हा आर्थिक प्रश्‍न नूल (ता. गडहिंग्लज) येथील महिला बचत गटांच्या ग्रामसंघाने सोडविला आहे. ग्रामसंघाकडून सदरची रक्कम कर्जाऊ उपलब्ध करून दिली आहे. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT