कोल्हापूर

नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळा संपन्न

जितेंद्र आणुजे

कोल्हापूर: नृसिंहवाडी( Nrusinhwadi)येथे कृष्णा-पंचगंगा नदीच्या (Krishna-Panchganga river)पाणी पातळीत पुन्हा रात्रीत 10 फुटाने पाणी पातळीत वाढ झाली असून या मौसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे दोन वाजता भाविकांच्या स्नानाच्या पर्वणीविना दत्तमंदिरात संपन्न झाला. दोन दिवसात येथे तब्बल वीस फूट पाणीपातळी वाढल्याने महापुराच्या धास्तीने ग्रामस्थांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. (nrusinhwadi-shree-datta-temple-area-20-feet-of-water-level-rain-update-kurundwad-marathi-news) 

गेले दोन दिवसात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेने येथील कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन दिवसात तब्बल 20 फुटाने एकूण वाढ झाली. आठवड्यात पावसाची संततधार चालू असलेने येथील कृष्णा-पंचगंगा नद्याच्या पाणी पातळीत पहिल्या रात्री दहा व काल रात्री पुन्हा दहा फूट पाण्याची पातळी वाढली आहे. दोन दिवसात एकूण वीस फूट पाणी पातळी वाढली पूरसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे.कृष्णा नदी पेक्षा पंचगंगा नदीच्या पाण्याचा जोरात प्रवाह असून पाण्याबरोबर जलपर्णी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहत येत आहे.

दरम्यान, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे दत्त देव संस्थानचे कर्मचारी यांनी  मंदिर परिसरातील  नदीकाठचे लाकडी व लोखंडी साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवले आहे. दोन दिवसात तब्बल 20 फुट वाढ झालेने नदीकाठी असणाऱ्या पूरग्रस्तांच्या मनात भीतीची छटा निर्माण झाली आहे. मुख्य दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी आलेने श्रींची उत्सवमूर्ती प.प.नारायणस्वामी महाराजांचे मंदिरात ठेवणेत आली असून तेथे मर्यादित सेवेकरी यांच्या सहकार्याने अत्यंत भक्तिभावाने नित्योपचार चालू आहेत.

यंदाही स्नान पर्वणीपासून भाविक वंचित..

या मौसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा पहाटे दोन वाजता दत्तमंदिरात संपन्न झाला. मात्र या वेळी कोणत्याही भाविकांना नदीपात्रात भक्तिभावानं स्नान करण्याच्या पहिल्या पर्वणीचा लाभ झाला नाही. गेल्या वेळीही भाविकांना दत्त मंदिर बंद असल्यामुळे स्नान पर्वणीचा लाभ झाला नाही.

जिल्हा परिषदेकडून नवीन नाव लवकर मिळणे गरजेचे...

पंधरा दिवसापूर्वी नृसिंहवाडी ग्रामपंचायतच्या अंतर्गत येथील नावाडी अरुण गावडे व संजय गावडे यांना जिल्हा परिषदेकडून नवीन नाव मंजूर आहे. यासाठी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पाठपुरावा केला. तसेच जिल्हा परिषद सदस्या परविन पटेल, सामाजिक कार्यकर्ते दादापाशा पटेल यांनी पुढाकार घेतला. मात्र वाढत चाललेल्या पाण्याच्या पार्श्वभुमीवर सध्या जिल्हा परिषदने ती नवीन मंजूर नाव पूरसदृश्य पार्श्वभूमीवर लवकर मिळणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT