Nutrition Garden To Be Built In Nul Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

बचत गट साकारणार नूलमध्ये पोषणबाग

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुकास्तरीय प्रदर्शनीय पोषणबागेची लागवड होणार आहे. नूल (ता. गडहिंग्लज) येथे ही पोषण बाग साकारणार आहे. त्यासाठी 30 हजार रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून महिला बचत गटांच्या ग्रामसंघाकडून पोषणबागेची देखभाल केली जाणार आहे. या माध्यमातून सेंद्रीय पद्धतीने विषमुक्त भाजीपाल्याची निर्मिती होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून महिला बचत गटांसाठी अर्थपुरवठ्यासह विविध उपक्रम राबविले जातात. महिलांनी उद्योग, व्यवसाय उभा करावेत, स्वत:च्या पायावर उभा राहावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. महिला बचत गटांना एकत्र करीत ग्रामसंघाची स्थापना केली आहे. या ग्रामसंघांच्या माध्यमातून आता पोषणबाग विकसित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तालुकास्तरावर एका प्रदर्शनिय पोषणबागेची निर्मिती होणार आहे. त्यानंतर प्रत्येक गावात अशा बागा विकसित केल्या जाणार आहेत. 

गडहिंग्लज तालुक्‍यात नूल येथे पोषणबाग उभारली जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीकडून दोन गुंठे जागा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून 30 हजार रुपयांचा निधीही मिळाला आहे. या बागेत संपूर्ण सेंद्रीय पद्धतीने भाजीपाला पिकविला जाणार आहे. सदर ग्रामसंघातील महिलांसह गरोदर स्त्रिया, स्तनदा माता, लहान मुले, किशोरवयीन मुलींना विषमुक्त, ताजा व पोषण तत्वानी युक्त भाजीपाला नियमित उपलब्ध होणार आहे. पोषणबागेसाठी आवश्‍यक गांडूळ खत, कंपोस्ट खत, दशपर्णी व जीवनामृत युनिट उभारले जाणार आहे. 

या भाज्यांची होणार निर्मिती... 
पोषणबागेत मेथी, पालक, चुका, शेपू, आळू, कोथिंबीर, अंबाडा या पालेभाज्या, वांगी टोमॅटो, कांदे, लसूण, भेंडी, गवार, मिरची, कोबी, फुलकोबी या फळभाज्या, गाजर, बटाटे, रताळे, मूळा, बीट, आले ही कंदमुळे, कारले, दोडका, भोपळा, घेवडा, घोसाळी या वेलवर्गीय फळभाज्यासह गवती चहा, तुळस, कोरफड, अश्‍वगंधा, शतावरी, अडुळसा या औषधी वनस्पती व फळझाडांचीही लागवड करण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT