obc community leaders meet to sambhaji raje chhatrapati 
कोल्हापूर

ओबीसी समाज मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यास सहकार्य करणार ; संभाजीराजे छत्रपती

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - मराठा आरक्षणाचा प्रश्न हा इतर समाजाला विश्वासात घेऊन सोडवला जावा अशी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आज ओबीसी समाजाचे नेते माझ्याकडे भेटायला आले होते. त्यांनी मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द दिला आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 

न्यायलयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यापासून मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक होताना दिसत आहे. शिवाय मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला  धक्का लागला तर देशभर आंदोलने करण्याची भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. याच पार्श्वभूमिवर आज ओबीसी समाज्याच्या नेत्यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचा शब्द संभाजीराजे यांना दिला. याचीच माहिती संभाजीराजे यांनी सोशल मीडियावरून दिली. 

दरम्यान, याआधिही सामाजिक न्यायमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावरून नाराजी व्यक्त केली होते. सध्या राज्यात ५२ टक्के सोबीसी समाजाची लोकसंख्या आहे. परंतु, लोकसंखेच्या तुलनेत या समाजाला आरक्षण मिळत नाही. शिवाय ओबीसी समाज्याच्या २७ टक्के आरक्षणात राज्यातील भटक्या-विमुक्त समाजाला आठ टक्के आरक्षण देण्यात आले आले असून यामुळे उर्वरित फक्त १९ टक्केच आरक्षण ओबीसी समाजाला आहे.

<

>

या समाज्यातील अनेक जाती हातावर पोट भरणाऱ्या आहेत. या समाजाची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. असे असताना ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले तर ओबीसी समाजावर अन्याय होईल अशी खंत वडेट्टीवार यांनी व्यक्त केली होती. 

दरम्यान, संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT