Obesity is on the rise in children tips for lifestyle marathi news
Obesity is on the rise in children tips for lifestyle marathi news 
कोल्हापूर

सावधान! मुलांमध्ये स्थूलपणा वाढतोय: जाणून घ्या कारणे,उपाय

मतीन शेख

कोल्हापूर : कोरोना महामारीमुळे लोकांचा दिनक्रम बदलला. कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा, मैदानी खेळ बंद झाले. त्यात बैठ्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये शारीरिक, मानसिक बदल होत आहेत. मुलांचा बदललेला आहार आणि दिनक्रम यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. लहानग्यांमध्ये आलेल्या शिथिलतेमुळे स्थूलतेची समस्या वाढत आहे.

मुलांमध्ये वाढत चाललेले जंकफूड तसेच बंद पाकिटातील ‘रेडी टू इट’ पदार्थांचे सेवन, कमीत कमी शारीरिक हालचाल, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट्‌सचा अतिवापर वाढत आहे. परिणामी मुलांना धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आदी लक्षणे दिसताच पालक डॉक्‍टरांकडे धाव घेत आहेत. मुलाचे वय आणि उंचीच्या गुणोत्तरानुसार आवश्‍यक वजनापेक्षा साधारण १० ते १२ किलो वजन अधिक दिसून येत असल्याने ते मूल स्थूलतेकडे झुकत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. लॉकडाउन काळात घरी असल्याने तसेच शाळा, मैदाने बंद असल्याने मुलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.


पौगंडावस्थेपर्यंत मुलांमध्ये शरीराचा विकास होत असतो. हार्मोन्सचे बदल घडत असतात. यामुळे लहान मुलांमध्ये शक्‍यतो अनुवंशिकरीत्या लठ्ठपणा आलेला असतो, तर काही मुलांमध्ये मुख्यत्वे खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैली यामुळे लठ्ठपणा येतो. मुलांच्या आहारावरील नियंत्रण आणि व्यायाम या मार्गानेच वजन कमी करता येते. लठ्ठपणावर औषध उपचार करण्यापूर्वी योग्य निदान व काळजी आवश्‍यक असल्याचे 
डॉक्‍टर सांगतात. 


असा टाळा लठ्ठपणा...
 मुलांना व्यायाम, खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.
 फास्ट फूडपासून दूर ठेवावे.
 सतत मोबाईल, व्हिडीओ गेम खेळणे टाळावे.
 चॉकलेट, साखरेचे पदार्थ देऊ नयेत.

स्थूल मुलांचे प्रमाण वाढत आहे. आहार आणि कमी शारीरिक हालचाल यास कारणीभूत आहे.स्थूलपणामुळे मुलांमध्ये इतर आजार वाढण्याची शक्‍यता असते. पालकांनी मुलांना कमी कॅलरीजचा आहार द्यावा. तसेच घरगुती व्यायामाची सवय लावावी.
- डॉ. शिशिर मिरगुंडे, बालरोगतज्ज्ञ

संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT