Omicron Virus
Omicron Virus esakal
कोल्हापूर

..अखेर कोल्हापुरात ओमिक्रॉनची धडक; जिल्ह्यात सापडला पहिला रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढतच चालली आहे.

कोल्हापूर : देशातील ओमिक्रॉन (Omicron Virus) बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच आज कोल्हापुरात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलंय.

कोल्हापुरातील आयटीआय (ITI) पाठीमागे असणाऱ्या हनुमान नगरातील एकच कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोना झाला होता. यापैकी दोघांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यात 4 पैकी 3 व्यक्तींचे नमुने ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले होते. यातील एका रुग्णाचा ओमिक्रॉन अहवाल Positive आला असून हा अहवाल आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. आता महापालिका आरोग्य विभाग (Kolhapur Municipal Health Department) पुढील कारवाई करत आहे.

ओमिक्रॉन बाधित असलेली व्यक्ती ही C.A. आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्व लोकांचे स्वॅब घेतले जाणार आहेत, तर संबंधित व्यक्तीची पत्नी व्यवसायानं डॉक्टर आहे. शिवाय, त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोधही सुरू असून आता महापालिका आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून पुढील कारवाई केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Paaru : पारू-आदित्यचं लग्न होणार पण...नव्या प्रोमोने प्रेक्षक नाराज

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT