one arrested in theft case kolhapur 
कोल्हापूर

एकावं ते नवलच! बायकोची हौस पुरवविण्यासाठी केली चक्क 'या' गोष्टींची चोरी 

राजेश मोरे

कोल्हापूर - पत्नीची हौस पुरविण्यासाठी साथिदाराच्या मदतीने मोटारसायकलसह मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या चोरट्यास आज राजारामपुरी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून पाच मोटारसायकलसह आठ मोबाईल संच जप्त केले. महेश राजाराम गायकवाड (वय 22, रा. गोकुळ शिरगाव, करवीर) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या साथिदाराचा शोध सुरू आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहर परिसरात मोटारसायकल चोरीचे प्रकार गेल्या काही महिन्यापासून वाढले आहेत. त्याच्या तपासाचे आदेश पोलिस निरीक्षक सिताराम डुबल यांनी गुन्हे शोध पथकाला दिले होते. पथकांने संशयित महेश गायकवाडला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने मोटारसायकल व मोबाईल चोरीचे गुन्ह्याची कबुली दिली. त्याने साथिदार संशयित प्रकाश शांताराम कोकाटेच्या मदतीने पाच मोटारसायकल व मोबाईलवर बोलच जाणाऱ्यांचे मोबाईल संच हिसकावून नेण्याचे आठ आठ प्रकार केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोन लाख 80 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित गुरव, कर्मचारी आनंद निगडे, प्रकाश पारधी, सुभाष चौगले, प्रविण पाटील, रोहित पोवार, महेश पाटील, रविकुमार आंबेकर, तानाजी दावणे, सिद्धेश्‍वर केदार, विशाल खराडे, प्रशांत पाथरे यांनी केली. 

पत्नीची हौस पुरविण्यासाठी कृत्य 
संशयित महेशचा काही महिन्यापूर्वी प्रेमविवाह झाला आहे. पत्नीची मोटारसायकल, मोबाईल, दागिने, कपडे आदीची हौस पुरविण्यासाठी त्याला पैशाची गरज होती. त्यासाठी त्याने साथिदार प्रकाश कोकाटेच्या मदतीने चोरीचा मार्ग अवलंबला. शहर परिसरातून पाच मोटारसायकल आठ मोबाईल संचावर त्याने डल्ला मारला. हे मोबाईल विकून त्याने पत्नीची हौस भागविण्यास सुरवात केली. त्याच दरम्यान तो तावडीत सापडला आणि गुन्ह्यांचा उलगडा झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT