one corona positive man attended suicide in sangali 
कोल्हापूर

...त्यामुळे एका बापाला गळफास घ्यावा लागला, हेच दुर्दैव

सकाळ वृत्तसेवा

सांगली : दूधगाव (ता. मिरज) येथे कोरोना बाधित वडिलांची आत्महत्या आणि पाठोपाठ तरुण मुलाचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. मानवी मनाला वेदना देणारी ही घटना आहे, त्याने सारेच सुन्न आहे. दवाखान्याचे बिल कसे भागवू, साऱ्यांना कसे वाचवू, या विवंचनेत एका बापाला गळफास घ्यावा लागला, हेच दुर्दैवी आहे. कोरोनाचे संकट भले मोठे आहे, मात्र त्यातून आपण वाचू शकतो, हा भरवसा लोक हरवत चालले आहेत.

कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या आठ हजारांवर आहे. लोक लढाई जिंकत आहेत. १०० वर्षे पार केलेल्या एका गृहस्थाने कोरोनाला हरवले, ८४ वर्षाची आजी कोरोनामुक्त झाली. थोडा धीर धरण्याची, संयमाने वागण्याची ही वेळ आहे, मात्र आर्थिक तणावाखाली टोकाचे पाऊल उचलले जात आहे. काही ठिकाणी रुग्णालयात दाखल करून घ्यायला दीड लाख रुपयांचे डिपॉझिट मागितले जात आहे. काहीजण ५० हजार तर काहीजण एक लाख रुपये मागत आहेत. 

काही ठिकाणी दिवसाचा उपचार शुल्क दहा हजार रुपये आहे. या चर्चांनी रुग्णाला तणाव नाही आला तर आश्‍चर्य आहे. या स्थितीत घरातील कुणी कोरोना बाधित झाला तर पायाखालची वाळू सरकते, असा अनुभव आहे. या साऱ्यावर कुणाचे नियंत्रण राहिलेले नाही का, असा सवालही आता चर्चेत आहे.

मिरजेतील कोविड रुग्णालय, सांगलीत वसंतदादा शासकीय रुग्णालय आणि जिल्हा प्रशासन, महापालिकेने सुरु केलेली काही मोफत कोविड सेंटर आहे. ती फुल्ल आहेत. खासगी रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करण्यात आली आहे, मात्र कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बेड उपलब्ध होईल का, याचीही चिंता वाढली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duleep Trophy: तिलक वर्मा ९९ धावांवर आऊट अन् मग वैभव सूर्यवंशी, ईशान किशनसह पूर्व विभागानं जे केलं, त्यानं जिंकली कोट्यवधींची मनं!; Video

CSMT Redevelopment : सीएसएमटीचा ‘वर्ल्ड हेरिटेज’ दर्जा; पुनर्विकासाने मात्र रेल्वेचीच कोंडी! प्लॅटफॉर्म १६-१७ सात महिन्यांपासून बंद, आता १४-१५ ताब्यात देण्याची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा पहिलाच परदेश दौरा

MLA Manoj Kayande : सिंदखेड राजा मतदारसंघांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विद्यानंद बापट हल्ला प्रकरणातील संतोष चव्हाणचा जामीन न्यायालयाने फेटाळला

SCROLL FOR NEXT