One crore per annum for Rankala development Guardian Minister Patil's announcement kolhapur marathi news
One crore per annum for Rankala development Guardian Minister Patil's announcement kolhapur marathi news 
कोल्हापूर

रंकाळा विकासासाठी दरवर्षी एक कोटी रुपये :  पालकमंत्री पाटील यांची घोषणा

राजेंद्र पाटील

फुलेवाडी (कोल्हापूर) :  ऐतिहासिक रंकाळ्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी एक कोटी रुपये निधी देण्याची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली.
नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून रंकाळा परिसरात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे व स्वयंचलित पद्धतीने बसविलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. रंकाळा पदपथ उद्यानात हा कार्यक्रम झाला.

पालकमंत्री पाटील म्हणाले,रंकाळा हे कोल्हापूरचे वैभव आहे.येणाऱ्या पर्यटकांची अंबाबाई व रंकाळा ही दोन्ही जिव्हाळ्याची भेट देणारी ठिकाणे आहेत.त्यामुळे रंकाळा विकासासाठी निश्चितच योगदान दिले जाईल.पाटबंधारे विभागाकडे असलेली रंकाळा परिसरातील जागा हस्तांतरित करू.तातडीने 50 लाख रुपये निधी मंजूर करून रंकाळ्यावर विद्युतीकरणाचे काम करून रंकाळा प्रकाशमय केला जाईल. रंकाळा व कळंबा ही शहरातील दोन्ही ठिकाणे राज्यात आदर्शवत  करण्यासाठी काम करु.

आमदार ऋतुराज पाटील म्हणाले,शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत रंकाळा विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी मी घेतली आहे. रंकाळ्यावर नगरसेवक देशमुख यांनी नाविन्यपूर्ण काम केले. रंकाळा संवर्धनात लोकांचा असलेला सहभाग खरोखरच कौतुकास्पद आहे.

शारंगधर देशमुख म्हणाले, पालकमंत्री पाटील व महापालिका फंडातून रंकाळा परिसराचा विकास केला आहे. या पुढील काळातही रंकाळ्याचा सर्वांगीण विकास करू.


 रंकाळा संवर्धनासाठी विशेष योगदान दिल्याबद्दल शाहीर राजू राऊत,श्रीकांत कदम,सुधीर गांधी,  अजित मोरे,गुंडोपंत जितकर, राजेंद्र पाटील,विकास जाधव, धोंडीराम चोपडे,प्रा.एस.पी. चौगुले,सुभाष हराळे,आनंदराव चिखलीकर,संभाजी पोवार,कृष्णा सुतार,पांडुरंग इंगवले, ऋषीराज जाधव,अमित बुट्टे यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.संदीप मगदूम यांनी सूत्रसंचलन केले. किरण पाटील यांनी आभार मानले.

संपादन- अर्चना बनगे


 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT