One crore rupees fund for Balasaheb Desai teaching center soon distributed 
कोल्हापूर

बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी....

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर केलेल्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटी रुपयांचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात आज झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीसुद्धा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. सामंत म्हणाले, ‘‘२०१० पासून विविध विद्यापीठांमध्ये अध्यासनांचा आढावा घेऊन ती सुरळीत चालण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक साहाय्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. येत्या काळात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन विद्यापीठे व संस्थाचालक यांच्या प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्यात येतील. जेणे करून त्यांचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात येईल.’’ शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील अग्रणी असून येथील ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्‍युरिटी अँड डाटा सायन्सेस’चे राष्ट्रीय संस्थेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने सर्वसमावेशक स्वरूपाचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना त्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना केली.या वेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्वागत केले. कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाविषयी पॉवरपॉइंट सादरीकरण केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, कोल्हापूरचे विभागीय सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

टीचर्स ट्रेनिंगचा प्रोजेक्‍ट

कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी इस्रो आणि आय.आय.टी. (मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठाचा स्वत:चा खासगी सॅटेलाईट विकसित करण्याचा मानस असल्याचे मंत्री उदय सामंत यांना सांगितले. त्यावर, हा चांगला उपक्रम असून त्यासंदर्भात आवश्‍यक सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, आपल्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच महाविद्यालये निवडून त्याठिकाणी सॅटेलाईट अगर नेटवर्कच्या माध्यमातून टीचर्स ट्रेनिंगचा पायलट प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने तयारी करावी, अशी सूचना त्यांनी केली.

सीमाभागात मराठी महाविद्यालय

महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागात महाराष्ट्राच्या हद्दीत मराठी महाविद्यालय सुरू करण्याचा मानस असून सध्या तो विचार प्राथमिक अवस्थेत आहे. हा विचार पूर्णत: अराजकीय स्वरूपाचा असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा न पोहोचविता सीमाभागातील मराठी भाषेच्या शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना मराठी शिक्षण देण्यासाठी हे महाविद्यालय असावे, असा हेतू आहे. त्या दृष्टीने योग्य स्थळाची निवड करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मंत्री श्री. सामंत यांनी केली. विद्यापीठामधील विविध प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच वर्षांच्या कालावधीत साधारणत: दहा कोटींची तरतूद करता येईल का, या दृष्टीनेही विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT