One crore special fund for CPR Hospital on the occasion of Chief Minister Uddhav Thackeray's birthday 
कोल्हापूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास एक कोटीचा विशेष निधी...

संदीप खांडेकर

कोल्हापूर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास एक कोटी रुपयांच्या विशेष निधीतून बेड व कपाटे हे साहित्य देत असून, त्याद्वारे उपचार पद्धतीस गती मिळून त्याचा फायदा तत्पर रुग्णसेवेस होईल,‌ असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आज येथे व्यक्त केला. सीपीआरला त्यांच्याच हस्ते बेड व कपाटांचे वितरण झाले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री. क्षीरसागर म्हणाले, "मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी व कुशल नेतृत्वाने राज्य प्रशासन गेले चार महिने कोरोनाच्या महासंकटाशी लढा देत आहे. कोरोना लढ्यात अविरत कार्यरत असणारे सर्वच योद्धे अभिनंदनास पात्र आहेत. ऐंशी टक्के टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार सर्व शिवसैनिक काम करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालये सुसज्ज असणे ही काळाची गरज आहे."

ते म्हणाले,"गेल्या दहा दिवसांत कोल्हापूर शहरासह  जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख पाहता, आरोग्य यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट होताना दिसत आहेत. कोरोनाच्या महामारीने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची गरज जाणवते. त्यामुळे सामाजिक भान जपून मुख्यमंत्री ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआर रुग्णालयास एक कोटींचे बेडस आणि कपाटे उपलब्ध करून आरोग्य यंत्रणेस बळकटी देण्याचे काम करत आहोत."

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले,"श्री. क्षीरसागर यांनी सामाजिक भावनेतून केलेला बेड व कपाटे वितरणाचा कार्यक्रम स्तुत्य आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला असून, आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम केले आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या माध्यमातून सीपीआर रुग्णालयास स्वतंत्र कोरोना वॉर्ड देणगी स्वरूपात देण्याचा झाला."

यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, अधिष्ठाता डॉ. आरती घोरपडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील,  डॉ. अजित लोकरे, अभ्यागत समिती सदस्य सुनील करंबे, शशिकांत रावळ- वाघमारे, महेंद्र चव्हाण उपस्थित होते.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT