One day for school Undertaking for Department of School Education 
कोल्हापूर

आता एक दिवस शाळेसाठी ; शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम  

युवराज पाटील

शिरोली पुलाची (कोल्हापूर) : जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांना शासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने एक दिवस शाळेसाठी हा एक उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये शासकीय यंत्रणेतील वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी महिन्यातून एकदा शाळेला भेट देऊन शाळेतील सोयीसुविधांचे मूल्यमापन करून मूलभूत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्याबाबत सूचना देणार आहेत.

या उपक्रमामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शाळांच्या संख्येनुसार जिल्हाधिकारी ते तहसीलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, जिल्हा स्तरावर शासकीय यंत्रणेत कार्यरत वर्ग एक आणि वर्ग दोनचे अधिकारी यांनी एका वर्षात तीन शाळांना भेटी देणे आवश्यक आहे. तसेच हा  उपक्रम आनंददायी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस शाळेस भेट द्यावी. चालू अभ्यासक्रमाच्या काही भागाचे अध्ययन करावे, तसेच विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे मूल्यमापन करावे लागणार आहे. शाळेला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद शाळांतील प्रवेश वाढवण्याबाबतच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शाळा भेटीमध्ये भौतिक सुविधा, क्रीडा साहित्य, स्वच्छतागृह, शालेय पोषण आहार यांचे मूल्यमापन करून त्याबाबतचा अहवाल सादर करायचा आहे. या उपक्रमात शालेय शिक्षण विभागासह पंचायत राज, ग्रामविकास, महसूल विभाग यांचाही सहभाग असेल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असून शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कमी झाल्याशिवाय आणि शाळा पूर्ववत विद्यार्थ्यांनी भरल्याशिवाय हा उपक्रम प्रत्यक्षात येणे शक्य नाही. परिणामी, हा उपक्रम शाळांमध्ये राबविण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

राज्यात जिल्हा परिषद शाळांप्रमाणेच नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्याही शाळा आहेत. मात्र एक दिवस शाळेसाठी या उपक्रमात या शाळांना समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे शाळांच्या विकासासाठी, पटसंख्या वाढवण्यासाठी या उपक्रमात नगरपालिका, महानगरपालिका शाळांनाही समाविष्ट करण्याची मागणी होत आहे.


"शाळेमध्ये एखादा प्रशासकीय अधिकारी येणार असल्यास,  विद्यार्थ्यांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता असते. अधिकाऱ्यांस पाहणे, त्यांनी आत्मविश्वासाने दिलेले भाषण ऐकणे, त्यांच्याशी बोलणे यासाठी विद्यार्थी उत्साही असतात. तसेच शालेय जीवनात भेटलेला अधिकारी कायम डोळ्यासमोर राहतात आणि आपणही त्यांच्याप्रमाणे बनावे, ही जिद्द निर्माण होते आणि त्यातून विद्यार्थी घडू लागतात. त्यामुळे हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे."

-रघुनाथ पाटील, अध्यक्ष, सुर्योदय शिक्षण प्रसारक मंडळ, शिरोली पुलाची

 संपादन - धनाजी सुर्वे 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT