one dead in accident at kolhapur ajra
one dead in accident at kolhapur ajra 
कोल्हापूर

येथे ओशाळली माणुसकी ; धडक देवून गेला निघून, गमवावा लागला एका निष्पापाला जीव 

सकाळ वृत्तसेवा

उतूर (कोल्हापूर) - रस्त्यात कोठेही अपघात घडला असल्यास अपघासग्रस्तास तातडीने मदत करावी अशी एक सामान्य भावना आहे. परंतु, काही ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत होत नाही. त्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मुमेवाडी घाटात नुकतीच अशीच एक घटना घडली आहे. अपघातानंतर वाहनधारक निघून गेल्यामुळे एकाला जीव गमवावा लागला आहे. 

कोल्हापुरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याबाबत अधिक माहिती अशी, आजरा-कोल्हापूर रस्त्यावर मुमेवाडी घाटात बहिरेवाडी (ता.आजरा) गावच्या हद्दीत अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. 

घाटात पंचरत्न नावाचे हाॕटेल आहे. त्यापासून २०० फुट अंतरावर अनोळखी पुरषाचा मृतदेह असल्याची माहीती आजरा पोलिसांना मिळाली. त्यानी घटनास्थळी पहाणी केली असता अवजड वाहनाने ठोकरल्याने सुमारे ३५ वयोगटातील पुरूषाचा मृतदेह रस्त्याशेजारी गटारीत पडल्याचे आढळले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ओळख पटेल असे काहीही सापडले नाही. 

अवजड वाहनाने ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. त्याच्या अंगावर लाल रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाची पँट आहे. याबाबात कोणास माहीती असल्यास त्यांनी आजरा पोलिस ठाण्यासी संपर्क साधावा असे आवहान सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यानी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT