one dead in accident kolhapur uttur 
कोल्हापूर

कोल्हापूर : उतूर जवळील कार अपघातात कुडाळचा युवक जागीच ठार

अशोक तोरस्कर

 उत्तूर -  उत्तूर  (ता.आजरा) गावाजवळ कार(  क्रमांक  - एम.एच.०७ ए जी ५१६६) पलटी होवून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे.  रोहित रमाकांत कुडाळकर (वय    २५ रा. कुंभारवाडी, ता.कुडाळ ,जि.सिंधुदुर्ग) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. आज (दि. १४) पहाटे चार वाजता स्मशानभूमीजवळ हा अपघात घडला. यामध्ये चालक ओंकार मेघनाथ वालावलकर  (वय  २४  लक्ष्मीवाडी कुडाळ), जग्गनाथ सुर्यकांत पेडणेकर  ( वय ३० रा.कुडाळेश्वर,ता.कुडाळ), रघुनाथ बाबू कुंभार (वय ३० रा.कुभारवाडी ,ता.कुडाळ), बाबूराव सुभाष  परब  (वय २९  रा.नाबरवाडी  ता.कुडाळ)  हे चौघे जखमी झाले. अपघाताची नोंद आजरा पोलिसांत झाली आहे.
 

कुडाळ येथील मित्र परिवार एकवीरा देवीचे दर्शन घेवून महाबळेश्वर -कोल्हापूर - आजरा मार्गे कुडाळकडे जात होते. उतूर जवळ वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्त्याकडेला आसलेल्या सिमेंट पोलला धडकून  रस्त्याकडेच्या चरीत पलटी झाली. यामध्ये रोहीत गाडीमधून बाहेर फेकला गेला. त्यामुळे तो गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. इतर चौघे जखमी झाली. अपघाताचे वृत समजताच पोलिस व नागरिकांनी जखमींना १०८ रुग्णवाहीकेतून उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज येथे दाखल केले.

चालकाने गाडी भरधाव वेगाने, अविचाराने चालवली व रोहीत याच्या मृत्यूस  कारणीभूत ठरल्याने ओंकार  वालावलकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक  फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत. 

संपादन - धनाजी सुर्वे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT