one dead and 22 new corona patient in kolhapur district
one dead and 22 new corona patient in kolhapur district 
कोल्हापूर

मोठी बातमी - कोल्हापुरात सायंकाळपर्यंत ४८ नव्या रूग्णांची भर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर  - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात सायंकाळपर्यंत तब्बल ४८ नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ४३१ वर पोहोचली आहे. यातील १८ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. आजवर एकूण ८६५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील आठ शासकीय रुग्णालयांत ४४४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. 

आज सकाळी २६ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर आता आलेल्या अहवालानुसार आणखी २२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता आलेल्या २९ रूग्णांपैकी, करवीर १५, चंदगड एक, हातकणंगले एक, पन्हाळा एक, शिरोळ एक शाहुवाडी दोन तर कोल्हापूर शहरातील एकाचा समावेश आहे. 

बावड्यातील कोरोनाबाधिताचा मृत्यू

दरम्यान, गेल्या चार दिवसापूर्वी अहवाल पाॅझिटिव्ह आलेल्या बावड्यातील कोरोना रूग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या चार दिवसांपूर्वी लक्षणे दिसायला लागल्यानंतर त्यांन उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा अहवाल तपासला असता त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सांकाळी उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.  

‘ते’ डॉक्‍टर ठणठणीत
कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या ताराबाई पार्कातील डॉक्‍टरांची प्रकृती ठणठणीत आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह इतर २५ जणांचे स्वॅबचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.


संपादन - धनाजी सुर्वे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Loksabha election 2024 : जळगावमध्ये स्ट्राँग रुमचे CCTV काही वेळासाठी बंद; जिल्हाधिकारी म्हणतात...

Gautam Gambhir : केकेआरमध्ये थांबण्यासाठी शाहरूखने गंभीरसमोर ठेवला होता ब्लँक चेक

Swati Maliwal: "बलात्कार, जीवे मारण्याची...", स्वाती मालीवाल यांचा ध्रुव राठी अन् आपवरती मोठा आरोप

Farah Khan : सगळ्यांना ओरडणारी फराह 'या' व्यक्तीला घाबरते; फराहने स्वतःच केला खुलासा

Paneer Kheer : पनीरची भाजी खाऊन कंटाळलात, तर आज संकष्टी स्पेशल पनीरची खीर बनवा

SCROLL FOR NEXT