Crime News esakal
कोल्हापूर

Belgaum Crime : बहिणीच्या पतीला मेहुण्यानं धारदार शस्त्रानं भोसकलं; 'या' कारणावरून दोघांत प्रचंड वाद

कोणत्या कारणाने चाकूने भोसकून खून करण्यात आला, याचा तपास सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

मारेकरी व मृत दोघांचेही गाव एकच आहे. घरगुती कारणावरून यांच्यात वाद सुरू होता असे समजते.

चिक्कोडी : बहिणीच्या पतीचा मेहुण्याने खून केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी उशिरा घडली. चिक्कोडी (Chikkodi) शहरातील विद्यानगरमध्ये ही थरारक घटना उघडकीस आली. ईरगौडा शिवपूत्र टोप्पगोळ (वय ४५ रा. जैनापूर, ता. चिक्कोडी) असे खून झालेल्याचे नाव आहे.

संजय विरूपाक्ष बकरे (वय ४३, रा. जैनापूर ता. चिक्कोडी) असे संशयित मारेकऱ्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, ईरगौडा हे जैनापूरचे रहिवाशी असून कंत्राटदार व क्रश मालक आहे. मारेकरी व मृत दोघांचेही गाव एकच आहे. घरगुती कारणावरून यांच्यात वाद सुरू होता असे समजते.

त्याच कारणातून संजयने आपल्या बहिणीच्या पतीचा खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. ईरगौडा हे सैन्य दलातून निवृत्त होऊन सध्या कंत्राटदार व क्रशर सुरू करून व्यवसायात उतरले आहेत. त्यांचे जैनापूर येथे व चिक्कोडी येथेही घर आहे. चिक्कोडी येथील घरात शनिवारी असताना संजयने येऊन त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून खून केला आहे.

यानंतर शेजाऱ्यांनी ईरगौडा यांना दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. संशयित मारेकरी संजय याचेही गावात दुकान आहे. कोणत्या कारणाने चाकूने भोसकून खून करण्यात आला, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच चिक्कोडीचे मंडल पोलिस निरीक्षक विश्वनाथ चौगुले, उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली यांनी भेट देऊन पंचनामा केला. घटनेची नोंद चिक्कोडी पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला वेग; पुणे विभागातील चार जिल्ह्यांत ६२०० हेक्टर जमीन संपादित होणार

Satish Jarkiholi ED Raid : मंत्री सतीश जारकीहोळींसह कन्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या घरांवर ईडीची छापेमारी; १८ ठिकाणी धाड

प्रणालीचं नाव घेताच कल्ला, आपल्याला कुणीही विचारत नाही, भडकली जान्हवी किल्लेकर; व्हायरल व्हिडिओवर किरण माने म्हणाले-

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Satara Crime: मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा AI मॉर्फ केलेला फोटो पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा; तीन फेसबुक अकाउंटधारकांसह यूट्यूब चॅनेलवर कारवाई

SCROLL FOR NEXT