One Lakh 93 Thousand fine recovered In Gadhinglaj Kolhapur Marathi News
One Lakh 93 Thousand fine recovered In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांकडून गडहिंग्लजला मिळाला एवढा महसूल

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे प्रत्येकाला सक्तीचे आहे. तरीसुद्धा या नियमांचे उल्लंघन करून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर येथील पालिकेने दंडात्मक कारवाईचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत 1141 जणांवर अशी कारवाई करून पालिका प्रशासनाने 1 लाख 93 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाला सुरवात झाल्यापासून येथील पालिकेने शासनाकडून येणाऱ्या प्रत्येक नियमांसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केली. नगराध्यक्षा स्वाती कोरी, उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाने प्रशासनातील कर्मचारी उपाययोजना राबवण्यात आघाडीवर राहिले. परिणामी शहर तीन महिने कोरोनामुक्त राहिले. गेल्या चार दिवसांत शहरात दहा रुग्ण आढळले आहेत. ते सर्व वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले. सुरवातीला प्रबोधन करण्यात आले. नंतर हळूहळू जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विनामास्क, सोशल डिस्टन्स न पाळणे आणि ठरवून दिलेल्या वेळेनंतरही दुकान सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

विनामास्क व सोशल डिस्टन्स न पाळणे या कारणासाठी प्रत्येकी शंभर रुपयांचा दंड लावण्यात आला. दोन महिन्यांत आतापर्यंत मास्क न वापरता सर्रासपणे फिरणाऱ्या 1141 लोकांकडून 1 लाख 93 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची धास्ती बसली असून मास्क वापरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा स्थानिक संसर्ग रोखण्यात यश मिळाले आहे. 

पोलिसांकडूनही कारवाई 
पोलिसांनीही सोशल डिस्टन्स न पाळणे आणि विनामास्क फिरणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमांतर्गत कारवाई सुरू केली आहे. प्रत्येक चौकात थांबून पोलिसांनी मोटारसायकलची कागदपत्रे तपासणीसह मास्क नसणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण झाली असून त्याचाही परिणाम मास्क वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT