one more corona positive in belgum taluka 
कोल्हापूर

ब्रेकिंग - बेळगाव तालुक्‍यात आणखी एक पॉझिटिव्ह...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - जिल्ह्यात दोन दिवसांत सात नवीन रुग्ण आढळल्यामुळे अख्खा जिल्हा ढवळून निघालेला असताना बेळगाव तालुका पीरणवाडीत आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आज (ता.14) आढळला. नवीन बाब म्हणजे कुडची आणि हिरेबागेवाडीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. पण, आज पिरणवाडीत रुग्ण आढळून आला आहे. बाधित फेब्रुवारी महिन्यांत दिल्लीहून परतला होता. होम क्वारंटाईन केले होते. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोना कक्षात दाखल केले आहे.

पीरणवाडीतील तरुण फेब्रुवारी महिन्यांत दिल्ली प्रवास केला होता. त्यानंतर निझामुद्दिनमधील तबलिगी मरकजची घटना उघडकीस आली. संशयित रुग्णांची माहिती घेतली. त्यामध्ये बेळगाव तालुक्‍यातील पिरणवाडीमधील 33 वर्षिय तरुणाने दिल्ली प्रवास केल्याची माहिती पुढे आली. त्याला होम क्वारंटाईन केले. अहवाल प्रयोगशाळेला दिला. तपशिल आज (ता.14) उपलब्ध झाला. अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. प्रशासन खडबडून जागे झाले. बाधितांचा किती जणांशी संपर्क आला. त्यांच्यात लक्षणे दिसत आहेत का? हे  तपासण्यासाठी कुटूंबिय, नातेवाईकांना क्वारंटाईन केले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांमध्ये सात नवीन रुग्णांची भर पडली. पैकी सहा कुडची आणि एक हिरेबागेवाडीतील आहे. त्यामध्ये आज एकाची भर पडल्यामुळे बाधितांची संख्या 18 झाली. कॅम्प येथे एक, बेळगुंदीत एक, हिरेबागेवाडीत पाच आणि कुडचीत सर्वाधिक दहा रुग्ण मिळून 17 कोरोना संसर्ग आहेत. त्यामध्ये पिरणवाडी येथील एकाची भर पडल्यामुळे बाधित रुग्णांची संख्या अठरा झाली आहे. जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मनहळ्ळी आज (ता.14) सायंकाळपर्यंत पिरणवाडीला निर्बंधित क्षेत्र (झोन) म्हणून घोषित करण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT