one person crime background and he is don on rajasthan in kolhapur crime case 
कोल्हापूर

राजस्थानचा कुख्यात गुंड राहत होता कोल्हापूरच्या तरूणीसोबत लिव्ह इनमध्ये

सकाळ वृत्तसेवा

उजळाईवाडी (कोल्हापूर) : 2019 मध्ये पोलिसांवर हल्ला करून जेल मधून फरार झालेल्या राजस्थान आणि हरियाना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गॅंगस्टर पपला सरनोबतवाडी येथे आपल्या प्रियेसीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. परंतु, आपल्यासोबत राहणारा प्रियकर एक कुख्यात गुंड असल्याचे समजताच प्रियेसीच्या पायाखालची वाळूच सरकली. 

जिममध्ये गेल्यानंतर त्याची ओळख दुसऱ्या प्रेयसीशी झाली. ही तरुणी आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमा शिक्षणल घेत होती. पहिल्या पतीपासून तिचा घटस्फोट झाला होता. राजस्थानातील रॉयल फॅमिली मधील राजबिंडा व्यक्तिमत्व असलेला उधल सिंह त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या जियाला राज्यस्थान पोलिस अटक करून जयपूरला नेईपर्यंत उधल सिंग हा एका खतरनाक टोळीचा मोहरक्या असल्याचे माहीतच नव्हते. अचानक अटक करून स्वतंत्रपणे राजस्थान पोलिस जियाला जयपूरला घेऊन जात असताना हमसून रडत आपणास का अटक केली आहे, हे जिया विचारत होती. परंतु जयपूर विमानतळावर ज्यावेळी पपलाची खरी ओळख तिलासमजताच ती अक्षरश: कोसळली.

जिममध्ये शरीर कमावण्यासाठी येणाऱ्या पपलाने पहिल्या पतीपासून घटस्फोटित जियावर प्रेमाची मोहिनी टाकली. आपल्या खोट्या ओळखीचा पुरावा म्हणून बनावट आधार कार्ड ही त्याने दाखवून तिचा विश्वास संपादन केला व दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. अशातच त्याची आणखीन एक प्रेयसी या भागातच राहत होती. काळ्या कारवायांसाठी आपला व आपल्या घराचा वापर करून घेत आहे याची किंचितही कल्पना जियाला आली नाही. 

स्थानिक नागरिकांनाही पपला उर्फ विक्रम गुर्जर याने कोणतीही दहशत किंवा गुंड प्रवृत्तीचे दर्शन दाखवली नसल्याने कुणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता. लुटीतील ३२ लाख रुपये जियासह इतर मैत्रीणींवर उधळत राजेशाही थाटात मस्त ऐषारामीत पपला जिंदगी जगत होता.

पोलिसांना आव्हान

सप्टेंबर 2019 पासून एके-47 ने पोलिसांवर हल्ला करीत पपला फरार झाला होता. त्याला शोधण्यासाठी हरियाणा व राजस्थान पोलिसांना हुलकावनी देत असताना पपला सोशल मीडियावर ॲक्टिव होता. इंस्टाग्राम वरील एका पोस्टद्वारे त्याने 'शेर को पकडना गिधड का काम नाही' असे स्वतःला वाघ म्हणत पोलिसांना आव्हान दिले होते. या आव्हानांची राजस्थानमध्ये जोरदार चर्चा होती. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत जेरबंद करीत पपलाच्या आव्हानास सडेतोड उत्तर दिले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT