गडहिंग्लज : नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (नाटा) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी चार-पाच महिन्यांपासून परिश्रम घेतले होते. विशेष म्हणजे त्यासाठी लॉकडाउनच्या अडथळ्यांवरही यशस्वीपणे मात केली; पण ऑनलाईन परीक्षेत निर्माण झालेला अडथळा त्यांना त्रासदायक ठरला. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले आहे. परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
हेही वाचा - त्यामुळे मुख्यमंत्र्यांची देवावर श्रद्धा कमी...
कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ही दिल्लीस्थित संस्था आहे. या संस्थेतर्फे आर्किटेक्चरची राष्ट्रीय योग्यता चाचणी (नाटा) घेतली जाते. बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. या परीक्षेच्या माध्यमातून आर्किटेक्चरला आवश्यक असणाऱ्या गुणांची चाचणी घेतली जाते. यात विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता, ड्रॉईंग, कल्पकता, विचार करण्याच्या शक्तीचा समावेश आहे. ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होते. नाटाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्रॅश कोर्सला प्रवेश घेतला. गडहिंग्लजमध्ये शिकवण्या नसल्याने कोल्हापूर येथील शिकवणी लावली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे लॉकडाउन झाले. त्यावर मात करीत विद्यार्थ्यांनी शिकवणीही ऑनलाईन पूर्ण केली. दरम्यान, आज दुपारी साडेबारा ते पावणेतीन या कालावधीत नाटाची चाचणी परीक्षा होती. विद्यार्थ्यांनी कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरकडून दिलेल्या सूचना पाळल्या. पण, साईटच ओपन होत नव्हती. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतरही परिस्थितीत बदल झाला नाही. त्यामुळे चाचणी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागले. विद्यार्थ्यांनी ही बाब पालकांच्या कानावर घातली. तसेच अन्य ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला, तर काही ठिकाणी चाचणी परीक्षा सुरळीत तर काही ठिकाणी अडचणी आल्याचे समोर आले. चार-पाच महिने परिश्रम घेऊनही चाचणीपासून वंचित राहिल्याने विद्यार्थी निराश झाले.
यापूर्वीही असाच प्रकार...
‘नाटा’तर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत असा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वी झालेल्या परीक्षेतही अडचणी आल्याचे सांगण्यात येते. त्यावेळी अनेक विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपासून वंचित राहिले होते. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली होती. आज पुन्हा तोच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.