Online gambling is rampant in Kolhapur district ... 
कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात ऑनलाईन जुगार फोफावतोय...

राजेश मोरे

कोल्हापूर ः घरबसल्या मोबाईल, लॅपटॉप संगणकावर खेळला जाणारा बेकायदेशीर "ऑनलाईन जुगार' सध्या फोफावतोय. एजंटाच्या माध्यमातून चालणाऱ्या या जुगारात आपली मुले अडकण्याची धास्ती पालकांना वाटू लागली आहे. त्यावर सायबर पोलिस ठाण्याचा करडा वॉच आहे. 
मटका जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस दलाने धडक कारवाई केली. एप्रिल 2019 मध्ये तर यादवनगरातील मटका अड्ड्यावर छापा टाकून तब्बल 42 जणांवर मोका लावला. तीन पानी जुगार अड्ड्यावरही पोलिसांची कारवाई सुरूच आहे. याला पर्याय म्हणून घरबसल्या खेळता येईल असा "ऑनलाईन जुगारा'चा पर्याय काळेधंदेवाल्यांनी पुढे आणला आहे. त्यात सतत मोबाईल, लॉपटॉपद्वारे ऑनलाईन असणारी तरुणाई अडकत चालली आहे. मोबाईल, लॅपटॉप, संगणकावर जुगाराचे स्पॉफ्टवेअर इन्स्टॉल केले जाते. यात अत्यंत गोपनीयता ठेवून जुगार खेळणाऱ्यांना जुगाराची लिंक पाठवली जाते. त्याला वैयक्तिक आयडी पासवर्ड तयार करून दिला जातो. जुगारात आवश्‍यक असणारे पैशाच्या स्वरूपातील क्रेडिट ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाते. त्याचे पेमेंट जुगार खेळणाऱ्यांना ऑनलाईन करावे लागते. एजंटाच्या माध्यमातून हा जुगार खेळला जातो. या जीत व हार यातून पॉईंट कमी-जास्त होत असतात. अखेर त्याचा ऑनलाईन पैशात हिशेब केला जातो. अशा जुगारात एका तरुणाची 22 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार सायबर पोलिसांनी गेल्या दहा दिवसांपूर्वी कारवाईतून पुढे आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघा एजंटांना अटकही केली होती. 
या जुगारात आपली मुले अडकणार तर नाही ना, अशी धास्ती आज पालकांना वाटू लागली आहे. अशा ऑनलाईन जुगारावर सायबर 
पोलिस ठाण्याची करडी नजर आहे; पण याबाबत अपेक्षित तक्रारी येत नसल्याने कारवाईत अडचणी येत आहेत. 

अर्थपूर्ण घडामोडीही 
ऑनलाईन गेम खेळणाऱ्या काही जणांनी लॉकडाउनच्या काळात दुकाने बंद ठेवली. एकीकडे चांगल्या गोष्टीचे काम करताना खात्यातीलच अधिकारी या ऑनलाईन गेमवाल्यांना बोलावून घेऊन त्यांच्याविरुद्ध कारवाईची भीती ही घालत आहेत. खेळ सुरू असेल, बेकायदेशीर असेल तर कारवाई केलीच पाहिजे. मात्र, इतरवेळी कारवाईकडे अर्थपूर्ण घडामोडींमुळे दुर्लक्ष करायचे आणि आता यातील काही जणांना बोलावून घेऊन अर्थपूर्ण चर्चा ही करण्यात काही जणांनी पुढाकार घेतला आहे. यावर जिल्हा पोलिसप्रमुख कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले. 


 
बेकायदेशीररीत्या ऑनलाईन जुगारावर सायबर पोलिस ठाण्याची करडी नजर आहे. याबाबत माहिती मिळाल्यास संबंधितांनी पोलिस ठाण्यात तक्रारी द्याव्यात. 
- संजय मोरे, पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

संपादन ः यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2025

सोलापुरात नवरात्रोत्सवही डीजेमुक्तच होणार! मध्यवर्ती मंडळांच्या एकाही पदाधिकाऱ्यांकडून ‘डीजे’ची नाही मागणी; पोलिस आयुक्त म्हणाले, साऊंड स्पीकरला परवानगी, पण...

अग्रलेख : चालढकल पुरे

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 18 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT