online shopping or buying fraud increased in all places it's dangerous to people in belgaum 
कोल्हापूर

सावधान ! दिवाळीत ऑफरच्या नावाखाली होतीये लुट

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दिवाळीत घसबसल्या ऑनलाईन शॉपिंग किंवा खाद्यपदार्थ मागविण्यावर नागरिक अधिक भर देतात. त्यासाठी अनेकांनी मोबाईलमध्ये पेंमेंट ॲप्स डाऊनलोड केले आहेत. सायबर गुन्हेगारांनी याचाच लाभ उठवत ऑनलाईन गंडा घालणे सुरू केले आहे. दिवाळीच्या तोंडावर अनेक कंपन्यांकडून ग्राहकांना फोन करून तुम्हाला लॉटरी लागली आहे.

‘तुम्ही इतके पैसे भरा’ अशा ऑफर दिल्या जात आहेत. मात्र, यापासून वेळीच सावध राहणे आवश्‍यक आहे. दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर आली आहे. दिवाळीत मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन खरेदी केली जाते. त्या प्रमाणात फसवणूकही होते. अनेकजण सायबर सेलकडे तक्रार दाखल करत नाहीत. सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्यास यानंतर होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसवता येऊ शकतो.

विविध पेमेंट ॲप्स वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. इंटरनेटवरून घरबसल्या वस्तू मागविणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यासोबतच कुणाला पैसे पाठवणे, विविध प्रकारची बिले चुकती करणे, मोबाईल रिजार्च यासह किराणा दुकानातील सामान विकत घेणे आदींचे पेमेंट आता मोबाईलवरूनच केले जात आहे. स्मार्टफोनमध्ये विविध ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार केले जातात. मात्र, ते तितकेच धोकादायकही बनले आहेत. यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

आम्ही बॅंकेतून बोलतोय, पेटीएमची केवायसी करून देतो, एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे, असे अनेक फंडे सायबर गुन्हेगार वापरून नागरिकांना जाळ्यात ओढतात. काही वेबसाईटवरून सेकंड हॅंन्ड दुचाकी, चारचाकी वाहने, मोबाईल फोन व अन्य गॅझेट्‌स कमी किमतीत विक्रीला उपलब्ध असतात. ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून ही खरेदी केली जाते. पैसेही पाठविले जातात. मात्र, ग्राहकाला हवी ती वस्तू मिळत नाही. यामुळे सावधानता बाळगणेही गरजेची आहे. यासंदर्भात कुणीही फोन केल्यास त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नये. तो सायबर गुन्हेगार असू शकतो. यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास सायबर सेलकडे तक्रार द्यावी.

"दिवाळीत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन खरेदी केली जाते. यापूर्वी माझ्या मित्राची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ऑनलाईन बुकींग केलेली वस्तू न येता दुसरीच वस्तू आली. यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे."

- महादेव खोत, एक ग्राहक

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Cricketer Death : भारताच्या क्रिकेटपटूचा मृत्यू! फलंदाजी करून परतत असताना जमिनीवर कोसळला, तडफडला अन्...; वाचा दुर्दैवी घटना

Nilanga News : आधार कार्डमधील विसंगतीचा विद्यार्थ्यांना फटका; निलंग्यात सात हजार ८३४ विद्यार्थी ‘अपार’ आयडीविना

ठरलं तर मग फेम अभिनेत्री गेली 17 वर्षं करतेय या आजाराचा सामना; "माझी ऐकू येण्याची क्षमता.."

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

SCROLL FOR NEXT