only one tender for ajara factory decision made by a board of directors meeting with attendance of bank chairman hasan mushrif 
कोल्हापूर

आजरा कारखान्यासाठी फक्त एकच निविदा; दोन आठवड्यांची मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील गवसे  येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्यासाठी बॅंकेने महिन्यापूर्वी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार बॅंकेकडे फक्त एकच निविदा दाखल झाली. त्यामुळे बॅंकेने निविदा भरण्यासाठी पुढील दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. 

या बैठकीला माजी खासदार निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, आमदार राजूबाबा आवळे, अनिल पाटील, आर. के. पवार, पी. जी. शिंदे, श्रीमती ऊदयांनीदेवी साळुंखे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, रणजीत पाटील, असिफ फरास, अशोकराव चराटी, प्रताप उर्फ भैय्या माने असे संचालक उपस्थित होते. 

थकीत कर्जापोटी केडीसीसी बॅंकेच्या ताब्यात असलेल्या आजरा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. एक महिन्यापूर्वी म्हणजेच जुलै रोजी या निविदा प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानुसार पुणे येथील विजन इंडिया सेव्हन प्रोसेसर, डेव्हलपर्स अँड ट्रेडर्स या एकच निविदा बॅंकेकडे दाखल झाली. 

बॅंकेने घेतलेल्या मुदतवाढीच्या निर्णयानुसार 10 सप्टेंबर 2020 पर्यंत निविदा अर्जांची विक्री होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्री बीड मीटिंग होणार आहे. 14 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी एक वाजेपर्यंत निविदा अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून त्याच दिवशी दीड वाजता निविदा उघडल्या जाणार आहेत. 

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT