कोल्हापूर : शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी निरी (नॅशनल एन्व्हायर्न्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट)ने दिलेल्या अहवालातील मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिकेने आराखडा बनवला; मात्र या आराखड्याची अंमलबजावणी संथ गतीने सुरू आहे. राष्ट्रीय हरित लवादाने २०२१ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणात किती घट झाली पाहिजे याचे उद्दिष्ट दिले; पण सध्या या कामाची गती पाहता अंमलबजावणीचे मोठे आव्हान आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने वायू प्रदूषणात अग्रेसर असणाऱ्या शहरांची यादी बनवली. यात महाराष्ट्रातील १७ शहरांचा समावेश आहे.
कोल्हापूर शहराचाही यात अंतर्भाव आहे. निरी संस्थेने या सर्व शहरांमधील वायू प्रदूषणाच्या स्थितीचा २०१८ मध्ये अहवाल बनवला. या अहवालातील निष्कर्षानुसार हरित लवादाने त्या महापालिकांना २०२१ पर्यंत वायू प्रदूषणात किती घट झाली पाहिजे, याचे उद्दिष्ट दिले. या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून महापालिकेने एक समिती नेमली. यात आयुक्त, पर्यावरण अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक अधिकारी यांच्यासह निमंत्रित सदस्य यांचा समावेश आहे.
आराखडा बनवण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने १२ लाखांचा निधीही दिला. त्यानंतर महापालिकेने बनवलेल्या समितीने आराखडा बनवला. शहरातील वायू प्रदूषण कमी होण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, त्यांची अंमलबजावणी कशी करायची, त्याचे टप्पे कसे असावे, याची विस्तृत मांडणी आराखड्यात केली; मात्र २०१९ चा महापूर आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट यामुळे या आराखड्याची अंमलबजावणी संथ सुरू आहे. नव्या आयुक्तांच्या प्राधान्य यादीत अद्याप याचा समावेश झालेला दिसत नाही.
हरित लवादाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वायू प्रदूषण नियंत्रण आराखडा महापालिकेने बनवला आहे. यातील उपाययोजना प्रदूषण पातळी कमी करण्यास उपयुक्त आहेत; मात्र महापालिका प्रशासनाने यावर गतीने काम करण्याची आवश्यकता आहे.
- उदय गायकवाड, सदस्य, वायू प्रदूषण नियंत्रण आराखडा समिती.
अशी आहेत आव्हाने...
बांधकामांचा धुरळा कमी करणे डिझेल जनरेटरची संख्या कमी करणे रस्त्यावरील धुरळा कमी करणे वाहतुकीला शिस्त लावून होणारे प्रदूषण थांबवणे फटाक्यांच्या वापराला बंदी करणे
शहरातील औद्योगिक प्रदूषणाला अटकाव.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ‘निरी’ने दिलेले उद्दिष्ट
मुद्दा २०१८ ची स्थिती २०२१ चे उद्दिष्ट
हवेतील प्रदूषके ६ टन प्रतिदिन ३.५८ प्रतिदिन
शहरातील कोळशाचा वापर ५ टक्के १ टक्के
एल.पी.जी., सी.एन.जी. वापर २२ टक्के ५९ टक्के
पक्के रस्ते ७७२ किमी १०० किमी वाढ
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.