Panhala Pavankhind tracking Experience the thrill on Sakals Facebook and YouTube channel
Panhala Pavankhind tracking Experience the thrill on Sakals Facebook and YouTube channel 
कोल्हापूर

पन्हाळा - पावनखिंड पदभ्रमंतीच्या थराराची अनुभूती घ्या सकाळच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनल वरुन...

संदीप खांडेकर

कोल्हापूर - किल्ले पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहीम शरीराची दमछाक करणारी आहे. ऊर्जेचा थरार अनुभवताना साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाच्या स्मृती मोहिमेतून जपल्या जातात. ज्याच्या पायात ताकद तोच मोहिमेत टिकतो, अशी मोहिमेची ओळख आहे. साहसवीरांची मोहीम असेच तिचे वर्णन केले जाते. राज्यभरातील साठहून अधिक संस्था-संघटनांतर्फे मोहिमेची आखणी केली जाते. यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ही मोहीम स्थगित केली असली तरी सोशल मीडियावर मोहिमेच्या स्मृती जागवल्या जात आहेत.

शिवछत्रपतींच्या चरित्रातील रोमहर्षक इतिहासाचे पान म्हणजे पावनखिंडचा रणसंग्राम. हिल रायडर्सने पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेची सुरवात केली. त्या थराराची अनुभूती देण्यासाठी अन्य संस्था-संघटनांनीसुद्धा या मोहिमेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. दहा वर्षांच्या मुला-मुलींपासून, तरुण, वयाच्या साठीपर्यंतच्या नागरिकांना मोहिमेत सहभागी करून घेतले. मोहिमेचे नियोजन काटेकोरपणे केले जाते. संस्थांचे पदाधिकारी मोहिमेचे माहितीपत्रक छापणे, ते ठिकठिकाणी पोचवणे, मोहीमवीरांचे अर्ज भरून घेणे, त्यांच्या निवासाची व्यवस्था करणे, मुक्कामाच्या ठिकाणी व पांढरेपाणीत जेवणाची व्यवस्था करण्याचे नियोजन करावे लागते.

पन्हाळगड ते मसाई पठार या मार्गावरच मोहीमवीरांचा कस लागतो. पाठीवरील सॅक, पायातील बूट, रेनकोट यांचेही त्यांना ओझे वाटू लागते. पाय जड झाल्याने काहींना पुढे पाऊलही टाकायला नको, असे वाटत राहते. त्यांना मानसिक बळ देण्याबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथकही सोबत घ्यावे लागते. कोरोनामुळे मोहिमेचा थरार यंदा मात्र मोहीमवीरांना अनुभवता येणार नाही. त्यामुळे आयोजक संस्था-संघटनांनी या आधीच्या मोहिमांची छायाचित्रे अपलोड करण्यास सुरवात केली आहे. कोल्हापूर हायकर्सचे सागर पाटील यांनी फेसबुक पेजवर दुर्गभ्रमंतीचे अनुभव शेअर केले आहेत. पन्हाळा ते पावनखिंड मध्यवर्ती समन्वय समितीतर्फे "पावनखिंडीचा वाटेवर' या विषयावर फेसबुक पेजवरून रणसंग्रामाच्या स्मृती जागवल्या जाणार आहेत.

सकाळ फेसबुक, यूट्यूबवर प्रसारण

सकाळ फेसबुक व यूट्यूबवर "पन्हाळा ते पावनखिंड' रणसंग्रामाचा थरार अनुभवता येणार आहे. दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके रणसंग्रामाबाबत माहिती देणार असून, त्याचा पहिला भाग रविवार (ता.12) व दुसरा भाग सोमवारी (ता.13) प्रसारित केला जाणार आहे.

फाॅलो करा...

  • फेसबुक पेज - www.facebook.com/SakalNews
  • यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/c/SakalMedia

पन्हाळा ते पावनखिंड मार्ग असा - पन्हाळा, तुरुकवाडी, म्हाळुंगे, मसाई पठार, खोतवाडी, कुंभारवाडी, आंबवडे, करपेवाडी, रिंगेवाडी, कळकेवाडी, माळवाडी, पाटेवाडी, सुकामाचा धनगरवाडा, पांढरेपाणी, भाततळी, पावनखिंड.

  • एकूण अंतर - 54 किलोमीटर


आयोजक संस्था - हिल रायडर्स, सह्याद्री प्रतिष्ठान, मैत्रेय प्रतिष्ठान, निसर्गवेध परिवार, कोल्हापूर हायकर्स, गडकोट गिर्यारोहक, शिवशक्ती प्रतिष्ठान, गिरीभ्रमण, शिवराष्ट्र हायकर्स, ताराराणी एक्‍सपीडिशन्स, आनंदराव पोवार मर्दानी आखाडा, भरारी पथक आदी.

संपादन - मतीन शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT