Passport Kolhapur camp closed
Passport Kolhapur camp closed 
कोल्हापूर

पासपोर्टचा कोल्हापूर कॅम्प बंद ; कोरोनातही परदेशवारीला पसंती

राजेश मोरे

कोल्हापूर : कोरोनामुळे कोल्हापूरचा पासपोर्ट (पारपत्र) कॅम्प तात्पुरता बंद झाला. पण, या संकटातही परदेशवारीला पसंती वाढत आहे. कोल्हापूरचा कॅम्प पूर्ववत सुरू करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.


पुणे परिक्षेत्रांतर्गत कोल्हापूर, इचलकरंजीत पासपोर्ट कॅम्प सुरू होता. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी हे कॅम्प सुरू केले होते. मार्चपासून जग कोरोनाचा मुकाबला करत आहे. यामुळे परदेशात जाणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली. परिणामी पासपोर्ट विभागावरील कामाचाही ताण कमी झाला. या काळात कोल्हापूर व इचलकरंजीतील कॅम्प तात्पुरते बंद केले. नागरिकांना मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व समजले. त्याची अंमलबजावणीतून देशासह जगातील कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागले. तसे देशासह जगात लॉकडाउनमध्ये शिथिलताही दिली जाऊ लागली. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा अनेक कामासाठी आज नागरिक परदेशवारीला पसंती देऊ लागले आहेत.

त्याचबरोबर पासपोर्ट काढण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. पण त्यासाठी त्यांना पुण्याच्या कार्यालयाचाच आधार घ्यावा लागत आहे.पुणे कार्यालयाकडून येणाऱ्या अर्जांचे पोलिस मुख्यालयातील पारपत्र विभागात व्हेरिफिकेशन केले जाते. कोरोनापूर्वी मुख्यालयातील कार्यालयात व्हेरिफिकेशनसाठी दररोज सरासरी शंभरच्या घरात अर्ज येत होते. लॉकडाऊनमध्ये अर्जच येण्याचे प्रमाण जवळपास बंद झाले होते; पण लॉकडाउन शिथिलतेनंतर आता दररोज सरासरी १५ ते २० अर्ज व्हेरिफिकेशनसाठी येऊ लागले आहेत. हे प्रमाण वाढण्याची शक्‍यताही आहे. परदेशवारीसाठी पासपोर्ट काढण्यासाठी सध्या जिल्हावासीयांना पुण्याची वारी करावी लागत आहे. लॉकडाऊन शिथिलतेबरोबर कोल्हापुरातील पासपोर्ट कॅंम्प सुरू करावा अशी मागणी होत आहे.

पोलिस मुख्यालयातील पासपोर्टचे स्वरूप
२०१४ ते २० ऑक्‍टोबर २०२० अखेर 
वर्ष    प्राप्त अर्ज    निर्गत अर्ज
२०१४    १६,७६१    १६,७६१
२०१५    २०,११८    २०,११८
२०१६    १८,७२४    १८,७२४
२०१७    २७,१९५    २७,१९५
२०१८    ३१,६७७    ३१,६७७
२०१९    २८,८८०    २८,८८०
२०२०    ८,३२५    ८,१८९

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT