Patients Are Cleaning The Kovid Center Kolhapur Marathi News
Patients Are Cleaning The Kovid Center Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

उपचार घेणारेच करताहेत कोवीड सेंटरची स्वच्छता, वाचा चंदगड तालुक्‍यातील सविस्तर बातमी

सुनील कोंडुसकर

चंदगड : येथील कोवीड सेंटरमध्ये दाखल झालेले रुग्ण कोरोनाबरोबच अस्वच्छतेशी दोन हात करीत आहेत. खोल्या आणि परिसर स्वच्छतेकडे प्रशासनाचे दूर्लक्ष असल्याने ज्या ठिकाणी आपल्याला किमान दहा-पंधरा दिवस रहायचे आहे, तो परिसर आपणच स्वच्छ करायला हवा, अशी भुमिका घेऊन रुग्णांनी दररोज स्वच्छतेचा उपक्रम राबवला आहे. पहाटेच्या सत्रात स्वच्छता केली जाते. 

येथे फादर अग्नेल स्कूलमध्ये कोवीड सेंटर सुरू करण्यात आले आहे. कोरोना बाधीत रुग्णांना तिथे दाखल करुन उपचार केले जातात. आत्तापर्यंत अनेक रुग्णांनी या सेंटरचा आधार घेतला. बरे होऊन घरी गेले. नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना दिलेली स्वच्छतागृहांच्या सफाईची जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडली जात असली तरी वॉर्ड आणि परिसर स्वच्छतेचा प्रश्‍न सुरवातीपासून चर्चेत होता. अनेकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या परंतु ज्या विभागाकडे ही जबाबदारी आहे त्यांनी दूर्लक्षच केले.

गेल्या आठवड्यात इथे तिसऱ्या मजल्यावर दाखल झालेल्या रुग्णांपैकी काही तरूणांनी सुरवातीला प्रशासनाला याची माहिती दिली परंतु दाद मिळत नाही हे पाहून स्वतःच स्वच्छतेचा निर्णय घेतला. हातात झाडू घेऊन त्यांनी प्रत्येक खोली स्वच्छ केली. व्हरांड्याचीही स्वच्छता केली. ज्या खोलीत पूर्वी रुग्ण उपचार घेऊन गेले होते तिथे पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची वेष्टन, नारळाच्या करवंट्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्या सर्व गोळा करून विल्हेवाट लावली.

पाण्याने फरशी धुतली. सॅनिटाईजेशन केले. दुसऱ्या दिवशीपासून दररोज पहाटे उठल्याबरोबर आपली खोली आणि व्हरांडा स्वच्छ करण्याचा अलिखित नियमच बनला आहे. त्यामुळे या मजल्यावर स्वच्छता आणि टापटीप पहायला मिळते. त्याचा रुग्णांच्या मानसिकतेवरही चांगला परिणाम झाला आहे. दरम्यान, ज्यांच्याकडे स्वच्छतेची जबाबदारी आहे ते जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत असतील, तर वरीष्ठांनी त्यांच्यावर कारवाई करायला हवी. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्वच्छता करावी लागत असेल तर ते योग्य नसल्याच्या भावना व्यक्त होत आहेत. 

तुम्हाला काही काम नाही का? 
रुग्णांनी केलेल्या स्वच्छतेला प्रशासनातील अधिकारी अंगठ्याचे चिन्ह दाखवून कौतुक करतात. परंतु सोयी-सुविधांबाबत तक्रार केल्यास मात्र तुम्हाला काही काम नाही का हो? किती दिवस तुम्ही राहणार आहात तिथे? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरी आयसोलेट व्हा. अशा प्रकारचा उलट सल्ला दिला जातो. त्याबद्दलही नाराजी आहे. 

संपादन - सचिन चराटी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil: काँग्रेस अनेकदा फुटली पण सडोलीचा पाटील हलला नाही... २० वर्षे एकहाती किल्ला लढवणारे पीएन कोण होते ?

इलेक्टोरल बाँड्स खरेदीत दोन नंबरवर असणाऱ्या कंपनीला राज्यातील महत्वाची कंत्राटे

Glenn Maxwell : ग्लेन मॅक्सवेलने बुडवली RCBची बोट... एक रन काढण्यासाठी मोजले तब्बल २१ लाख

Buddha Purnima 2024 : बाबासाहेबांनी केली होती बुद्ध जयंतीला सुट्टीची मागणी

HSC Result 2024 : भलामोठा डोंगर चढून केली पायपीट अन् लेकीसोबत मिळवलं बारावीच्या परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT